Source :- ZEE NEWS

Pakistan Special Service Group: पहलगाममध्ये झालेल्य हल्ल्यात निष्पाम 27 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर संपर्ण देशात संतापाची लाट उसळलीये. आता भारताने या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मोठी कारवाई केलीये. काश्मीर खो-यातील 3 संशयित दहशतवाद्यांची घरं भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केलीयेत. त्यामुळे पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडालीये. पाकिस्तानसोबतचे संबंध तोडण्यात येत आहेत. पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची मागणी संतप्त भारतीय नागरीक करत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडे कसे सैन्य आहे? ते कशासाठी ओळखले जातात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

लोकांच्या मनात भीती

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर युद्धासारखी परिस्थिती आहे. या हल्ल्यानंतर दोघांमध्ये तणाव वाढला आहे आणि सीमेवर लष्करी हालचाली देखील दिसून आल्या आहेत. भारतातील नियंत्रण रेषेजवळ राहणारे लोक हळूहळू बंकरमध्ये स्थलांतरित होत आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही लष्करी संघर्ष सुरू होऊ शकतो, ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल, अशी भीती लोकांच्या मनात आहे. 

भारताच्या सीमेवरील सैनिक पूर्णपणे सतर्क 

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. परंतु भारतातील लोक पाकिस्तानला खरा धडा शिकवण्याची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत लष्करी संघर्षाची शक्यता वाढली आहे. भारताने आपल्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाला सतर्क केले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही लष्करी हालचालींना त्याच्याच भाषेत उत्तर देण्याच्या तयारीत भारत आहे. भारताच्या सीमेवरील सैनिक पूर्णपणे सतर्क झाले आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या सर्वात धोकादायक कमांडो फोर्सबद्दल जाणून घेऊया. 

विविध परिस्थिती हाताळण्यात विशेष कुशल

पाकिस्तानची सर्वात धोकादायक कमांडो फोर्स म्हणजे स्पेशल सर्व्हिस ग्रुप (SSG). हे कमांडो फोर्स व्हीआयपी सुरक्षा, दहशतवादी हल्ले आणि अपहरणाच्या परिस्थिती हाताळण्यात विशेष कुशल आहे. पाकिस्तानच्या एसएसजी कमांडोंचे प्रशिक्षण खूप कठीण असते. समोर आलेल्या माहितीनुसार, या कमांडोंना प्रशिक्षणासाठी अमेरिकन नौदलाच्या सील कमांडोकडे पाठवले जाते. पाकिस्तानचे एसएसजी कमांडो परदेशी अंतर्गत संरक्षण, गुप्तचर, थेट कारवाई, दहशतवादविरोधी कारवाया किंवा अपारंपरिक युद्ध मोहिमांसाठी पाठवले जातात.

SOURCE : ZEE NEWS