Source :- ZEE NEWS

India Pakistan War :  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानने पंजाबवर केलेल्या मिसाईल हल्ल्याबाबत अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे चीनचा भयानक चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पाकिस्तानी सैन्याकडे चिनी हत्यार सापडली आहेत.

पाकिस्ताननं पंजाबवर रात्री मिसाईल हल्ला केला. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने या मिसाईल्स पाडल्या. या यातील एक मिसाईल पंजाबच्या होशियारपूरमध्ये पाडण्यात आली. ही मिसाईल चिनी बनावटीची असल्याचं समोर आलंय. यावरुन पाकिस्तान चिनी हत्यारांच्या मदतीनं युद्धात उतरल्याचं उघड झालंय. दुसरीकडे  राजस्थानमध्येही पाकिस्तानी सैन्यानं बॉम्ब हल्ले केलेत. यातील एक जिवंत बॉम्ब जैसलमेरमध्ये आढळून आला आहे. 

पंजाबमध्ये चिनी बनावटीचं मिसाईल सापडलं आहे.चीनच्या भरवश्यावर पाकिस्तान युद्ध करत असल्याची चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानची साथ सोडल्याचा बनाव देखील चीन करत आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा चीनकडून विरोध करण्यात आला आहे, सध्याच्या परिस्थितीमुळे चीनकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 

पाकिस्तानने भारतावर PL-15E क्षेपणास्त्र डागले, पण ते टार्गेट गाठण्याआधीच हवेत नष्ट झाले. होशियारपूर, पंजाब येथे एक पूर्णतः सुरक्षित स्थितीत PL-15 लांब पल्ल्याचे हवाई-हवाई क्षेपणास्त्र आढळले, जे पाकिस्तानी JF-17 लढाऊ विमानातून डागले गेले होते पण स्फोट झाला नाही. भारतीय हेरोप (Harop) लोटरिंग म्युनिशनने लाहोरमधील चिनी बनावटीच्या HQ-9B हवाई संरक्षण प्रणालीचा नाश केला. या घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या विश्वासार्हतेवर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

पाकिस्तानच्या JF-17 लढाऊ विमानांचा वापर केला गेला, पण भारतीय हवाई दलाने त्यांना पाडले. पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात PL-15E लिहिलेल्या क्रूझ क्षेपणास्त्राचे अवशेष आढळले. पाकिस्तानला चीनकडून मिळालेली अत्याधुनिक शस्त्रेही भारतासमोर निष्प्रभ ठरली.

7 मे रोजी भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानची संरक्षण प्रणाली निष्प्रभ झाली आहे. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी भारतीय ठिकाणांना ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि जेट विमानांनी लक्ष्य केले, पण सर्व अयशस्वी ठरले. होशियारपूरमध्ये सापडलेले PL-15 क्षेपणास्त्र चीनच्या शस्त्रांची विश्वासार्हता कमी करत आहे.

SOURCE : ZEE NEWS