Source :- ZEE NEWS
Aamir Hamza: सैफुल्लाहनंतर पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी आमिर हमजावर गोळीबार करण्यात आला आहे. अमित हमजा हा हाफिज सईदच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हमजावर हल्ला केला. आमिर हमजा लष्करच्या सह-संस्थापकांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं.
यापूर्वी, रविवारी पाकिस्तानातील सिंध येथील अबू सैफुल्लाह खालिद याच्यावरही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. सैफुल्लाह, ज्याला रजाउल्लाह निजामानी खालिद म्हणूनही ओळखले जाते, तो लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) एक प्रमुख दहशतवादी आहे. तो 2000 पासून नेपाळमधून लष्करच्या कारवाया चालवत होता. जिथे तो भारत-नेपाळ सीमेवर दहशतवाद्यांची भरती, पैसा, रसद आणि हालचाली मॅनेज करायचा.
खालिदनेच 2006 मध्ये नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या मुख्यालयावर हल्ला करण्याची योजना आखली होती. यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले होते. 2005 मध्ये बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) वर झालेल्या हल्ल्याशीही त्याचा संबंध होता, ज्यामध्ये प्राध्यापक मुनीश चंद्र पुरी यांचा मृत्यू झाला होता आणि चार जण जखमी झाले होते. त्या हल्ल्यातील हल्लेखोर पळून गेले होते. या प्रकरणात खालिदचा जवळचा सहकारी अबू अनस याच्यावर आरोपपत्र दाखल आहे पण तो अजूनही फरार आहे.
SOURCE : ZEE NEWS