Source :- ZEE NEWS

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भितीचं वातावरण आहे. कारण दहशतवाद्यांना जो आसरा देईल त्याला कठोर शिक्षेला सामोर जावं लागेल. अशावेळी पाकिस्तानगुगल सर्च काय करत आहे ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल?

कोणत्याही देशात इंटरनेटवर सर्वात जास्त काय ट्रेंडिंग आहे हे जाणून घेण्यासाठी लोक गुगल ट्रेंड्सचा वापर करतात. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि त्यांचे प्रमुख आधीच सतर्क आहेत. अशा परिस्थितीत, या घटनेनंतर, तेथील लोकांनी त्यांच्या देशाच्या सुरक्षेबद्दल गुगलवर सर्च करायला सुरुवात केली आहे.

पाकिस्तानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, काही पाकिस्तानी भारत हल्ला करू शकतो अशी भीती व्यक्त करत आहेत. त्याच वेळी, बरेच लोक गुगलवर भारताचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत माहिती शोधत आहेत. इंटरनेटवरील काही युझर्झनी पाकिस्तानच्या गुगल सर्चचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. ज्यामध्ये पहलगाम हल्ल्याबाबत केलेला शोध वरच्या क्रमांकावर आहे.

गुगल ट्रेंड्समधून कळली ‘ही’ गोष्ट 

गुगल ट्रेंड्समधून गेल्या 24 तासात पाकिस्तानात सर्च केलेल्या गोष्टींमध्ये ‘पहलगाम’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की, पाकिस्तानचे लोक या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत करणार असलेल्या कारवाईवरुन चिंता व्यक्त करत आहे. तिथल्या लोकांपेक्षा सैन्याला आणि राज्यकर्त्यांना या गोष्टीची काळजी कितीतरी पटीने जास्त वाटत असेल.

पाकिस्तान या गोष्टीसाठी तयार? 

याशिवाय, भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनीही X वर लिहिले की, ‘मला विश्वास आहे की, पाकिस्तान भारताच्या कोणत्याही हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. वृत्तानुसार, पहलगाममधील हा हल्ला 4 दहशतवाद्यांनी केला होता, त्यापैकी 2 पाकिस्तानी असल्याचे सांगितले जात आहे.

या हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानी सोशल मीडियावरही दिसून येत आहे, जिथे #PahalgamTerroristAttack पासून #Modi पर्यंतचे हॅशटॅग जोरदार ट्रेंड करत आहेत. अनेक पाकिस्तानी लोकांनी त्यांच्या पोस्टमध्ये अशी भीती व्यक्त केली आहे की पंतप्रधान मोदी पाकिस्तानवर मोठा हल्ला करू शकतात.

ट्रेंडनुसार, पाकिस्तानमध्ये काश्मीर, मोदी, पुलवामा आणि जम्मू सारखे कीवर्ड देखील खूप शोधले गेले आहेत. जे दोन्ही देशांमधील नवीनतम परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता पाकिस्तानही सतर्क झाला आहे.

सध्या, पाकिस्तानमध्ये ‘पहलगाम हल्ला काश्मीर काश्मीर हल्ला भारत, पहलगाम हल्ला अपडेट भारत हल्ला पहलगाम दहशतवादी हल्ला, पहलगाम घटना भारत बातम्या, पहलगाममध्ये आज काय घडले पहलगाम काश्मीर, कनेक्शन पाक आर्मी’ असे कीवर्ड शोधले जात आहेत.

SOURCE : ZEE NEWS