Source :- ZEE NEWS
Indira Gandhi Children’s hospital (IGICH) located in Kabul Afghanistan : आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. ऑपरेशन सिंदुरनंतर भारत पाक सीमेवरच्या तणावात अनेक देशांनी भारताला उघडपणे पाठिंबा दिला. भारताचे अनेक देशांसह चांगले संबध आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर जवळचा एक देश चर्चेत आला आहे. या कट्टर मुस्लिम देशात एक मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयाला भारतातील बड्या हिंदू नेत्याच्या नाव देण्यात आले आहे.
या देशाचे नाव आहे अफगाणिस्तान. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अफगाणिस्ताने भारताची साथ दिली आहे. अफगाणिस्तान मुस्लीम राष्ट्र आहे. तरीही भारताला पाठिंबा देत पहलगाममध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. अफगाणिस्तान पाकिस्तानचा 36 चा आकडा आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. अफगाणिस्तानने भारताला पाकिस्तानविरोधात सर्वोतपरी मदत करण्यास तयारी दर्शवली आहे.
भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानचं पाणी बंद केले आहे. याळेच पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होणार आहे. पाकिस्तानला आणखी कोंडित पकडण्यासाठी आता भारताने अफगाणिस्तानच्या मदतीने मोठी योजना आखली आहे. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात जाणारं पाणीही भारत कुटनीतीने थांबवणार आहे. अफगाणिस्तानमद्ये शहतूत धरण बांधण्यात येणार आहे. शहतूत धरण योजनेसाठी भारत अफगाण सरकारला मदत करणार आहे. शहतूत धरण अफगाणिस्तानमधल्या काबुल नदीवर बांधलंय. भारत शहतूत योजनेसाठी 236 मिलियन डॉलरची मदत अफगाणिस्तानला देणार आहे. काबुल नदीवर धरण बांधल्यास या नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. काबुल नदी अफगाणिस्तानातून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा प्रांतामध्ये जाते. त्यामुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानमधूनसुद्धा जलकोंडी होणार आहे.
भारत देखील नेहमीच अफगाणिस्तानच्या मदतीसाठी तत्पर असतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये असलेले सर्वात मोठे रुग्णालय. अफगाणिस्ताणमधील या रुग्णालयाचे नाव आहे इंदिरा गांधी बाल चिकित्सालय (IGICH). भारत सरकारच्या पाठिंब्याने 1969 मध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले. यानंतर 1975 मध्ये इंदिरा गांधींच्या सन्मानार्थ याचे नाव बदलण्यात आले. इंदिरा गांधी बाल चिकित्सालय या नावानेच हे रुग्णालय ओळखले जाते.
काबूल मधील इंदिरा गांधी बाल चिकित्सालय हे रुग्णालयाला भारत सरकारच्या सहकार्याने स्थापन करण्यात आले. हे अफगाणिस्तानातील लहान मुलांचे सर्वात मोठे मुलांचे रुग्णालय आहे. दरवर्षी सुमारे 3 लाख लहान मुलांवर येथे उपचार केले जातात. येथे 2.5 लाख ओपीडी आणि 50,000 आयपीडीचा समावेश आहे. या रुग्णालयाला भारत सरकारकडून मदत केली जाते. ज्यामध्ये वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि इतर संसाधनांचा पुरवठा केला जातो.
SOURCE : ZEE NEWS