Source :- ZEE NEWS

भारतानं बांगलादेशवर ट्रेड स्ट्राईक केलाय. बांगलादेशातून तयार कपडे, अन्नपदार्थांची आयात भारतीय बंदरातून करण्यावर निर्बंध लादले आहेत. भारताविरोधात केलेली आगळीक बांगलादेशला महागात पडलीय. 

भारतानं पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीए आणि अझारबैजानला चांगलाच धडा शिकवलाय. दरम्यान या दोन्ही देशानंतर आता भारतानं आपला मोर्चा बांगलादेशकडे वळवलाय. बांगलादेशच्या मुहम्मद युनूस यांनी भारताविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलंय. कारण भारताकडून केलेल्या बंदीनतर बांगलादेशचा कापड उद्योग अडचणीत आलाय.

काय म्हणाले होते मुहम्मद युनूस?

भारताची ईशान्य भारतातील राज्य लँडलॉक्ड आहेत

त्यांना समुद्रापर्यंत जाण्यासाठी बांगलादेशच्या माध्यमातून जावं लागेल. 

चीन हा हिंद महासागरचा पालक आहे

युनूस यांनी चीनला शिपमेंट करण्याचं आमंत्रण देखील दिलं होतं. 

मुहम्मद युनूस यांनी केलेल्या या वक्तव्यानंतरच भारतानं बांगलादेश विरोधात पाऊल उचललंय. त्यामुळे बांगलादेशी वस्तुंची आयात आता काही बंदरावरूनच केली जाणार आहे. 

भारताचा बांगलादेशला दणका 

भारताकडून बांगलादेशवर ट्रेड स्ट्राईक

बांगलादेशमधून येणाऱ्या उत्पादनांना प्रत्येक बंदरांवर उतरवण्यास भारतानं बंदी घातली आहे

बांगलादेशातून तयार केलेले कपडे, अन्नपदार्थांची आयात भारतीय बंदरावरून करण्यास निर्बंध

प्लॅस्टिक, लाकडी फर्निचर आणि डाय यासारखी उत्पादनं आता मोजक्याच बंदरावर उतरवण्यात येणार

रेडीमेड गारमेंट्स आता केवळ मुंबईच्या न्हावा शेवा आणि  कोलकाता सी पोर्टच्या माध्यमातून भारतात येतील

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून यासंदर्भातली अधिसूचना जारी

पाकिस्तानसारखा बांगलादेश देखील मागील काही वर्षांपासून भारताविरोधात कुरघोडी करताना दिसतोय. दरम्यान भारतानं दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बांगलादेशनं पाकची बाजू घेतली होती. तसंच मुहम्मद युनूस यांनी चीनमध्ये जाऊन भारताविरोधात आगळीक केली. त्यामुळे पाकिस्तान आणि तुर्कीएसह बांगलादेशला देखील धडा शिकवणं गरजेचंच होतं.

SOURCE : ZEE NEWS