Source :- BBC INDIA NEWS

डायबेटिसच्या रुग्णांनी पायाची कशी काळजी घ्यायची? आपल्या पायावर किती बॅक्टेरिया असतात?

फोटो स्रोत, Getty Images

काही लोक दररोज त्यांना घासतात, तर काही लोक म्हणतात की, आंघोळ करताना त्यावर केवळ पाणी टाकलं किंवा पाणी टाकण्याची किंवा भिजवण्याची औपचारिकता केली तरी पुरेसं आहे. पण, तुम्ही या महत्त्वपूर्ण अवयवाची ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा साफसफाई करता ती पुरेशी आहे का?

तुम्ही आंघोळ करताना साबण आणि लुफाच्या मदतीनं शरीर स्वच्छ करत असता. त्यावेळी शरीरावरील काही भागांकडे तुमचं विशेष लक्ष जातं. उदाहरण सांगायचं झालं तर तुमचा अंडरआर्म म्हणजे बगलेखालचा भाग, तो परिसर तुम्ही व्यवस्थित साबण लावून अगदी स्वच्छ धुता.

परंतु, आपले पाय आपल्या शरीराच्या अगदी शेवटी असल्यानं त्याकडं दुर्लक्ष होऊ शकतं किंवा कंटाळा केला जाऊ शकतो.

परंतु, काही तज्ज्ञांच्या मते, तुमचे पाय देखील तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे किंवा त्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे.

पाय धुणं का महत्त्वाचं आहे ?

यूकेची नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) आणि यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) या दोन्ही संस्था दररोज साबणाने पाय धुण्याची शिफारस करतात.

यामागचं एक कारण म्हणजे दुर्गंधी टाळणं. पायाच्या तळव्यात प्रति चौरस सेंटीमीटर त्वचेवर घामाच्या 600 ग्रंथी असतात. हे प्रमाण शरीराच्या इतर कोणत्याही भागापेक्षा जास्त आहेत.

डायबेटिसच्या रुग्णांनी पायाची कशी काळजी घ्यायची? आपल्या पायावर किती बॅक्टेरिया असतात?

फोटो स्रोत, Getty Images

घामाला स्वतःचा वास नसतो. परंतु त्यात मीठ, ग्लूकोज, जीवनसत्त्वं आणि अमिनो आम्लाचे (अॅसिड) पोषणतत्त्वाने भरलेले मिश्रण असते. ते तिथे राहणाऱ्या बॅक्टेरियांसाठी (जीवाणू) एक “ऑल-यू-कॅन-ईट” बुफे सारखा असतो. तिथे बॅक्टेरियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते.

“पाय – विशेषतः पायाच्या बोटांमध्ये अत्यंत ओलसर, दमट आणि उबदार वातावरण असतं, त्यामुळं ते सूक्ष्मजीवांसाठी प्रजनन स्थळ बनू शकतं,” असं यूकेमधील हल विद्यापीठातील वुंड हिलिंगच्या लेक्चरर हॉली विल्किन्सन म्हणाल्या.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

बहुतांश लोकांच्या पायात सातत्यानं मोजे आणि पुन्हा त्यावर बूट असतात. त्यामुळं तिथं ओलावा निर्माण होतो, त्यामुळं परिस्थिती आणखी बिघडते.

जर तुम्ही मानवी त्वचेचा कोणताही भाग झूम करून पाहिला तर तुम्हाला तिथं 10,000 ते 10 लाख बॅक्टेरिया राहत असलेले दिसतील. त्वचेचे उबदार आणि ओलसर भाग, जसं की पाय. बॅक्टेरियाच्या प्रजातीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण असल्याचं मानलं जातं.

उदाहरण सांगायचं झालं तर, पाय हे कोरीनेबॅक्टेरियम आणि स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियांसाठी राहण्याचं आदर्श ठिकाण आहे.

डायबेटिसच्या रुग्णांनी पायाची कशी काळजी घ्यायची? आपल्या पायावर किती बॅक्टेरिया असतात?

फोटो स्रोत, Getty Images

बुरशी किंवा फंगसच्या बाबतीत तुमचे घामाने ओले झालेले पाय एस्परगिलस (मातीमध्ये सामान्यतः आढळणारा एक रोगकारक), क्रिप्टोकोकस, एपिकोकम, रोडोटोरुला, कॅन्डिडा (एक प्रकारचा यीस्ट जो नैसर्गिकपणे शरीरावर असतो पण संधीवादी रोगकारक होऊ शकतो), ट्रायकोस्पोरॉन आणि इतरांच्या प्रकारांसाठी आदर्श ठिकाण मानले जातात.

प्रत्यक्षात, मानवी पायामध्ये शरीराच्या अन्य कोणत्याही भागापेक्षा अधिक बुरशीजन्य प्रजातींची जैवविविधता असते.

पाय धुण्यासाठी हे एक चांगले कारण ठरू शकतं. एका अभ्यासात, संशोधकांनी 40 स्वयंसेवकांच्या पायांच्या तळव्याचे स्वॅब (नमुणे) घेतले. त्यांना असं आढळलं की, पाय धुण्याचा बॅक्टेरियांच्या संख्येवर लक्षणीय परिणाम होतो.

पायाची दुर्गंधी आणि बॅक्टेरिया

जे लोक दिवसातून दोन वेळा पाय धुवत होते, त्यांच्या त्वचेच्या प्रत्येक चौरस सेंटीमीटरमध्ये सुमारे 8,800 बॅक्टेरिया होते. ज्या लोकांनी दर दोन दिवसांनी पाय धुतल्याची माहिती दिली, त्यांच्यामध्ये प्रत्येक चौरस सेंटीमीटर त्वचेवर एक लाखांहून अधिक बॅक्टेरिया दिसून आले.

पण, फक्त आपल्या पायांचे तळवे सूक्ष्मजीवांनी भरलेले असणे म्हणजे याचा अर्थ असा नाही की, ते दुर्गंधीयुक्त असतील किंवा त्याबद्दल काही काळजी करण्याची गरज आहे. नेहमीप्रमाणं, ही फक्त संख्या नाही, तर इथं बॅक्टेरियाचा प्रकार खूप महत्त्वाचा आहे.

आपल्या पायावर असतात अब्जावधी बॅक्टेरिया, डायबेटिसच्या रुग्णांनी काय काळजी घ्यायची?

स्टॅफिलोकोकस हे पायांच्या दुर्गंधीसाठी जबाबदार असलेल्या वाष्पशील फॅटी ॲसिडस् (व्हीएफए) तयार करण्यामध्ये मुख्य भूमिका बजावतात. पायांच्या त्वचेवरील घामाच्या ग्रंथी इलेक्ट्रोलाइट्स, अमिनो ॲसिड, युरिया आणि लॅक्टिक ॲसिड यांचे मिश्रण सोडतात.

स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया याला खरी मेजवानी मानतात आणि जेव्हा ते अन्न खातात, तेव्हा अमिनो ॲसिडचे व्होलाटाइल फॅटी ॲसिडमध्ये (व्हीएफए) रूपांतरित करतात. मुख्य रासायनिक कारणीभूत घटक म्हणजे आयसोव्हॅलेरिक आम्ल, ज्याचा अप्रिय गंध असतो, जो “विशिष्ट चीजसारखा/ॲसिडिक नोट” म्हणून वर्णन केला जातो.

ही तुलना योग्य आहे, कारण अनेक चीजमध्ये अशाच प्रकारच्या व्होलाटाइल रासायनिक मिश्रणांचा समावेश असतो.

डायबेटिसच्या रुग्णांनी पायाची कशी काळजी घ्यायची? आपल्या पायावर किती बॅक्टेरिया असतात?

फोटो स्रोत, Getty Images

वर्ष 2014 मध्ये झालेल्या एका अभ्यासात, संशोधकांनी 16 लोकांच्या पायांचे स्वॅब घेतले. त्यांना त्यांच्या पायांच्या तळाशी 98.6 टक्के बॅक्टेरिया हे स्टॅफिलोकोसी असल्याचे आढळून आले.

व्हीएफएची पातळी, ज्यामध्ये मुख्य पायांच्या दुर्गंधीचं कारण असलेला आइसोव्हॅलेरिक ॲसिडचा समावेश आहे. पायाच्या तळाशी पायाच्या वरच्या भागाच्या तुलनेत ते लक्षणीयपणे वाढले होते.

एकूणच, या अभ्यासातून असे निष्कर्ष निघाले की, पायांच्या दुर्गंधीची तीव्रता स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियांच्या एकूण संख्येशी संबंधित होती. हे देखील साबण लावण्याचं आणखी एक कारण आहे.

केवळ पायांची दुर्गंधी रोखण्यासाठी पाय धुणे नाही. पायांच्या स्वच्छतेमुळे अनेक रोग, आजार आणि पायांशी संबंधित समस्या टाळता येऊ शकतात.

संसर्ग होण्याची शक्यता अधिक

न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलमधील त्वचाविज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक जोशुआ झीचनर म्हणतात की, “पायांच्या बोटांमध्ये लहान जागा असल्यामुळं, या भागांना सूक्ष्मजीव संसर्गाचा धोका असतो.”

“यामुळं खाज सुटणे, सूज येणे आणि दुर्गंधीही येऊ शकते. त्वचेचा अडथळा विस्कळीत झाल्यामुळं सूक्ष्मजंतू त्वचेच्या आत प्रवेश करून अधिक मऊ ऊतींचे संक्रमण, ज्याला सेल्युलायटिस म्हटलं जातं. यामुळं धोका वाढू शकतो,” असं ते म्हणतात.

झीचनर यांच्या मते, सर्वात सामान्य समस्या म्हणजे अ‍ॅथलीट फूटचा विकास, जे पायाच्या त्वचेवर होणारे एक फंगस इन्फेक्शन आहे. अ‍ॅथलीट फूट होणारे फंगस उबदार, ओलसर वातावरणात वाढतात. म्हणूनच, ही स्थिती सर्वात जास्त पायाच्या बोटांच्या मध्ये असलेल्या जागांमध्ये आढळते, ती मोकळी जागा प्रभावित करते.

हा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवल्यास, तुम्ही फंगसला दूर ठेवू शकता. हा भाग कोरडा राहणं चांगलं असतं, कारण अ‍ॅथलीट फूटमुळे खाज सुटणे, पुरळ येणे, त्वचा कोरडी होणे आणि पायाच्या तळव्यावर आणि बोटांच्या मध्ये क्रॅक होण्यासारखी लक्षणं दिसू शकतात.

Photo Caption- आपल्या पायांमध्ये विविध प्रकारचे फंगस आढळतात, जे या अंगाच्या अनेक सूक्ष्म भागात आपलं घर बनवतात. (Credit: Gorka Olmo/ BBC) bbc marathi health

फोटो स्रोत, Gorka Olmo/ BBC

पाय स्वच्छ ठेवल्यानं त्वचेचं संक्रमण टाळता येऊ शकतं, जसं की स्टॅफिलोकोकस किंवा स्यूडोमोनास बॅक्टेरियामुळे होणारे संसर्ग.

हे बॅक्टेरिया तुमच्या त्वचेवर नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असले तरी, जर ते जखमेमुळं तुमच्या रक्तप्रवाहात शिरले तर त्यामुळं गंभीर संसर्ग होऊ शकतो. अगदी किरकोळ संसर्गामुळे देखील फोड येऊ शकतात. हेअर फॉलिकल्स किंवा तेल ग्रंथींच्या आसपास त्वचेखाली पू तयार होऊ शकतो.

“पायांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे बॅक्टेरियाची जास्त असतात आणि जर तुमच्या पायांना भेगा पडल्या किंवा जखमा झाल्या असतील, तर ते शरीराच्या इतर भागांपेक्षा खूप हळूहळू बरे होतात,” असं विल्किन्सन म्हणतात.

“अशा परिस्थितीत, जर तुम्हाला इजा झाली तर त्या जखमेतील रोगकारक तिथे प्रवेश करू शकतात आणि ते अधिक प्रमाणात वाढू शकतात,” असंही विल्किन्सन यांनी म्हटलं आहे.

डायबेटिसच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज

पायांची स्वच्छता चांगली असली तरी त्वचेवर संसर्ग होऊ शकतो, परंतु नियमितपणे पाय धुण्यामुळं बॅक्टेरियाची संख्या कमी होते. त्यामुळं, जर तुम्हाला कधी तरी जखम झाली तर रक्तप्रवाहात प्रवेश करण्यासाठी आजूबाजूला कमी सूक्ष्मजीव असतील.

मधुमेह असलेल्या लोकांसाठी वारंवार पाय धुणं महत्त्वाचं आहे, कारण या स्थितीत असलेल्या लोकांना अल्सर आणि त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. संशोधनानं दर्शवलं आहे की, मधुमेह असलेल्या रुग्णांच्या पायांमध्ये त्वचेवर पॅथोजेनिक बॅक्टेरिया अधिक प्रमाणात असतात.

“ते इन्फेक्शन होण्याच्या संधीची वाट पाहत असतात. त्यामुळं मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांच्या पायांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळं त्यांना इन्फेक्शन किंवा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो,” असं विल्किन्सन म्हणाल्या.

चिंतेचं आणखी एक कारण म्हणजे, मधुमेह असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळं जर त्यांना संसर्ग झाला, तर त्यांचं शरीर त्याच्याशी लढू शकत नाही.

मधुमेह असलेल्या रुग्णांच्या पायांना जखम किंवा फोड होण्याची शक्यता जास्त असते, ती बरी होण्यास वेळ घेते. यावर वेळीच उपचार न केल्यास अंगठे, पाय किंवा अगदी तो अवयवही काढावा लागू शकतो.

“तुमचा मधुमेह नियंत्रणात नसेल, तर तुमच्या पायातील नसांना नुकसान होऊ शकते, त्यामुळं तुम्हाला पायांची जाणीव होत नाही,” असं विल्किन्सन म्हणाल्या.

“सोप्या पद्धतीनं पाय धुण्याच्या क्रियेने तुम्हाला तुमचे पाय चांगल्या प्रकारे तपासू शकता. ज्यामध्ये कोणतीही जखम किंवा कोरडेपणामुळे संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.”

डायबेटिसच्या रुग्णांनी पायाची कशी काळजी घ्यायची? आपल्या पायावर किती बॅक्टेरिया असतात?

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळं मधुमेह असलेल्या रुग्णांनी दररोज पायांची स्वच्छता करावी, असं शिफारस विल्किन्सन आणि डायबिटीज यूके सारख्या चॅरिटी संस्था करतात.

पण इतरांचं काय? काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, बहुतेक लोकांना दररोज पाय धुण्याचा आरोग्याच्या दृष्टिने कमी फायदा असतो आणि त्यामुळं त्वचारोगांच्या समस्या देखील वाढू शकतात.

शेवटी, त्वचा आवश्यक कार्ये करण्यासाठी तिच्या उपयुक्त सूक्ष्मजंतूंच्या समुदायावर अवलंबून असते. ते हानिकारक बॅक्टेरियापासून संरक्षण करतात, त्वचेला हायड्रेटेड आणि लवचिक ठेवण्यासाठी लिपिड्स तयार करतात आणि अगदी जखमा देखील बरे करण्यास मदत करतात.

स्वच्छ धुणे आणि स्क्रबिंग किंवा घासण्यानं फायदेशीर सूक्ष्मजीव निघू शकतात. विशेषतः जर पाणी गरम असेल तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळं त्वचा कोरडी, खाज सुटणे किंवा चिघळू शकते.

“जास्त धुण्यामुळे त्वचेचा अडथळा दूर होतो, त्वचा नैसर्गिक तेलांपासून वंचित राहते, ज्यामुळं कोरडेपण आणि सूज येऊ शकते,” असे झीचनर म्हणाले. यामुळं त्वचेला खाज सुटते, त्वचा कोरडी होऊ शकते आणि एक्झिमा सारखी परिस्थिती वाढू शकते.

“पायांवरील त्वचेला जास्त घासण्याची किंवा एक्सफोलिएट करण्याची आवश्यकता नाही,” असे झीचनर म्हणतात.

“कॉलस रोजच्या आघातामुळे विकसित होतात. परंतु ते प्रत्यक्षात पायांचे वातावरणापासून संरक्षण करतात. कॉलस काढल्याने त्या संरक्षणाची हानी होऊ शकते.”

अशा प्रतिजैविक साबणांचा वापर देखील एक चिंतेची गोष्ट आहे. कारण त्यामुळं त्वचेवरील सूक्ष्मजीवांचे नाजूक संतुलन बिघडू शकतो, फायदेशीर प्रजातींचा नाश होऊ शकतो.

शेवटी, आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीला काही प्रमाणात सूक्ष्मजीवांनी आव्हान दिलं पाहिजे, जेणेकरून ती आपलं कार्य योग्य प्रकारे करू शकतील. जर आपण लहानपणी सूक्ष्मजीव आणि विषाणूंच्या नियमितपणे संपर्कात आलो नाही, तर आपलं शरीर हल्ल्याला योग्यरितीने कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकणार नाही.

पाय कितीवेळा धुवावेत?

काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, वारंवार स्नान किंवा शॉवर घेणं यामुळं आरोग्यास हानी पोहोचू शकते. कारण यामुळं सूक्ष्मजीवांशी संपर्क कमी होतो आणि रोगप्रतिकारक प्रणालीचं कार्य बिघडू शकतं.

त्यामुळं आपल्याला कायमच प्रश्न पडतो, आपण आपले पाय किती वेळा धुणे आवश्यक आहे? याचे उत्तर काही प्रमाणात व्यक्तीवर अवलंबून असतं.

मधुमेह असलेल्या लोकांनी दररोज पाय धुवावेत अशी 100 टक्के शिफारस विल्किन्सन यांनी केली आहे.

“पण जर तुमची आरोग्य स्थिती साधारण असेल तर त्वचारोग तज्ज्ञ दोन-तीन दिवसांनी एकदा पाय धुण्यास सुचवतात. यामुळं चांगली स्वच्छता राखली जाऊ शकते आणि त्वचेतील नैसर्गिक तेलही जास्त जात नाही,” असं त्या म्हणाल्या.

Photo Caption-  आपल्या पायांवर राहणारे सूक्ष्मजीव महत्त्वपूर्ण कार्य पार पडतात, ते हानिकारक बॅक्टेरियाचा प्रतिकार करण्यास मदत करतात. (Credit: Gorka Olmo/ BBC) bbc marathi health

फोटो स्रोत, Gorka Olmo/ BBC

दरम्यान, विल्किन्सन यांनी म्हटलं की, जर तुम्ही अ‍ॅथलीट किंवा जिममध्ये जाऊन व्यायाम करणारे असाल तर तुम्हाला तुमच्या पायांची नियमितपणे स्वच्छता करणं आवश्यक आहे. तुम्ही कमी सक्रिय असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त नियमितपणे तुमचे पाय धुणे गरजेचं आहे.

फक्त धुण्याची वारंवारता म्हणजे किती वेळा धुता हे महत्वाचे नाही, तर ते पाय कसे धुता आणि तुम्ही ते कसे कोरडे करता यालाही आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे.

“आंघोळ करताना पायावर फक्त पाणी टाकणं म्हणजे पाय धुणं, असं खूप लोक मानतात. पण ते तसं नाही. तुम्ही प्रत्यक्षात साबणाच्या पाण्यानं पाय धुणं आवश्यक आहे,” असे विल्किन्सन म्हणाल्या.

डॅन बॉमगार्ड हे एक जीपी आणि यूकेमधील ब्रिस्टल विद्यापीठातील न्यूरोसायन्स आणि फिजिओलॉजीचे व्याख्याते आहेत. ते त्यांच्या रुग्णांना त्यांचे पाय व्यवस्थित कोरडे झाले की नाहीत याची खात्री करा असा सर्वात महत्त्वाचा सल्ला देतात.

“जेव्हा आपल्या बोटांदरम्यान ओलसरपण येतो त्यावेळी उबदार वातावरणात राहण्याची परवानगी दिली जाते. तेव्हा आपल्याला ऍथलीट फुट आणि इतर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते,” असं बॉमगार्ड म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC