Source :- ZEE NEWS
Vast hydrogen reserves discovered in Earth Crust : जगभरात ऊर्जा संकटाचे सावट आहे. यामुळे जगभरातील संशोधक पर्याटी ऊर्जा संसाधनांचा शोध घेत आहेत. अशातच पृथ्वीच्या पोटात सापडला एनर्जीचा महाप्रचंड साठा सापडला आहे. यामुळे पुढच्या 170,000 वर्षांची चिंता मिटणार आहे. हा विज्ञानाचा सर्वात मोठा शोध मानला जात आहे. जाणून घेऊया हा ऊर्जा साठा नेमका आहे तरी काय?
पृथ्वीच्या भूगर्भात सापडलेला हा खजिना म्हणजे हायड्रोजनचा साठा आहे. नैसर्गिक स्वरूपात हायड्रोजनचा साठा सापडला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ, डरहम विद्यापीठ आणि टोरंटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पथकाने हा आश्चर्यकारक शोध लावला आहे. पृथ्वीच्या खंडीय कवचात, म्हणजेच पृष्ठभागाच्या खाली खोलवर हायड्रोजनचा मोठा साठा लपलेला आहे. या शोधामुळे ऊर्जेच्या क्षेत्रात एक नवा अध्याय उघडला आहे.
हायड्रोजनला भविष्यातील ‘हरित इंधन’ म्हणून ओळखले जाते. हायड्रोजन जाळले जाते तेव्हा ते फक्त पाणी निर्माण करते, धूर किंवा CO₂ नाही. म्हणूनच हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत ते सर्वात प्रभावी शस्त्र मानले जाते. आतापर्यंत आपण वापरत असलेले हायड्रोजन बहुतेक कोळसा किंवा वायूपासून बनवले जाते. याचा अर्थ ती स्वतः प्रदूषण पसरवत आहे. पण पृथ्वीच्या आत आढळणारा हायड्रोजन पूर्णपणे नैसर्गिक आहे. याला ‘पांढरा हायड्रोजन’ असे म्हटले जात आहे.
पृथ्वीच्या आत हा हायड्रोजन कुठे आहे?
हायड्रोजनचा साठा तेल किंवा वायूसारख्या कोणत्याही मोठ्या साठ्यात नाही. तर खडक आणि पाण्याच्या रासायनिक अभिक्रियेने हळूहळू तयार होते आणि खाली जमा होते. शास्त्रज्ञांनी कॅनडाच्या प्राचीन खडक प्रदेशातील, कॅनेडियन शील्डमधील ठिकाणांचे नकाशे तयार केले आहेत, जिथे भूगर्भातून हायड्रोजन गळत होते. आता असा अंदाज लावला जात आहे की अशी ठिकाणे जगभरात पसरलेली असू शकतात आणि ती फक्त कॅनडा किंवा एका प्रदेशापुरती मर्यादित नाहीत.
हा हायड्रोजनचा साठा काढण्यासाठी, पारंपारिक तेल आणि वायू ड्रिलिंग काम करणार नाही. यासाठी नवीन तंत्रज्ञान, अचूक मॅपिंग आणि आधुनितक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. हायड्रोजन कुठे तयार होतो, तो कसा वाहतो आणि कुठे जमा होतो हे ठरवण्यास मदत करणाऱ्या तंत्रांवर शास्त्रज्ञ आता काम करत आहेत. जसे आपण हेलियम काढतो तशा प्रकारे हायड्रोजन काढता येवू शकते.
हायड्रोजनचे साठे योग्यरित्या शोधले गेले आणि काढले गेले तर ते जीवाश्म इंधनासाठी एक चांगला आणि शाश्वत पर्याय मिळणार आहे. एका अंदाजानुसार, हे साठे पुढील 1.7 लाख वर्षांसाठी संपूर्ण जगाची हायड्रोजनची मागणी पूर्ण करू शकतात. 2050 पर्यंत हायड्रोजनचा वापर 6 पट वाढणार आहे. यामुळे हायड्रोजनचा साठा निश्चितच शाश्वत आणि सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.
SOURCE : ZEE NEWS