Source :- ZEE NEWS
Chinese Spy French Diplomat Story : आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जो एक पुरुष असूनही तब्बल 18 वर्ष महिला म्हणून जगला. लग्न केलं बायको झाला एवढंच नाही तर एका मुलाची आई झाला. हे असं एक हेरगिरीच प्रकरण आहे, ज्यात चीनने फ्रान्सविरोधात सापळा रचला होता. महिलेच्या वेशात या पुरुष गुप्तहेराने आश्चर्यकारक काम करुन सर्वांच्या भुवाया उंचावल्या होत्या. गेल्या शतकात चीनला आपल्या देशाच्या दूतावासात काम करणाऱ्या फ्रेंच मुत्सद्दीमार्फत संवेदनशील माहिती मिळवता आली. ही कथा इतकी वेगळी आहे की, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
21 डिसेंबर 1938 रोजी चीनच्या शानडोंग प्रांतात जन्मलेल्या शी पेई पु यांना इतिहासातील सर्वात विचित्र हेर मानलं जातं. त्याच्या गुप्तहेर कारकिर्दीत, बीजिंग ऑपेरामध्ये गायिका म्हणून काम करणाऱ्या महिलेचा वेश धारण केलं. साहित्याचे ज्ञान आणि फ्रेंच भाषेतील प्राविण्य यामुळे ते बीजिंगमधील फ्रेंच दूतावासातील चार्ज डी अफेयर्सच्या मुलांसाठी शिक्षक म्हणून काम करणे सोपं झालं.
1964 मध्ये, शी पेई पू यांनी बीजिंगमधील फ्रेंच दूतावासातील 20 वर्षीय लेखापाल, फ्रेंच मुत्सद्दी बर्नार्ड बोर्सिकोट यांची भेट घेतली. त्यांची पहिली पोस्टिंग बीजिंगमध्ये झाली. या भेटीदरम्यान शी पेई पु यांनी फ्रेंच मुत्सद्द्याला फसवलं, की आपण एक महिला आहोत आणि त्याच्या प्रेमात पडलो आहोत. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात, चिनी लष्करी गुप्तचर एजन्सी किंगबाओने फ्रेंच मुत्सद्द्यावर बारीक पाळत ठेवण्यात आली होती. त्याला फ्रेंचमधील संवेदनशील माहिती आणि कागदपत्रे प्रदान करण्यास भाग पाडण्यात आलं.
राजनयिकाची फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयात बदली झाल्यानंतर, शी पेई पु यांनी बोर्सिकोटशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या नातेसंबंधातून मुलाच्या जन्माबद्दल सांगितलं. पण हे खोटे होतं, कारण शि डुडू नावाचा हा मुलगा अनाथ होता, ज्याला शी पेई पुने लष्करी गुप्तचरांच्या मदतीने आपली योजना पूर्ण करण्यास फसवण्यात आलं होतं.
बोर्सिकोटची इच्छा होती की त्याने शिसोबत पॅरिसला जावे आणि आपल्या मुलासोबत एकत्र राहायला सुरुवात करावी. दुसऱ्या देशात पोस्टिंगसाठी तो चीन सोडून गेला. यानंतर त्याला फ्रान्सला यायचे होते. जेव्हा बोर्सिकोट पॅरिसला शि पेई पु आणि त्याच्या मुलासोबत स्थायिक होण्यासाठी परतला. तेव्हा त्याला 30 जून 1983 रोजी फ्रेंच गुप्तहेरांनी शि पे पू सोबत अटक करण्यात आली. ज्यांनी परिस्थितीचे वास्तव उघड केलं.
तपासादरम्यान, हे स्पष्ट झालं की शी पेई पुने तिचं खरं लिंग लपवण्यासाठी बोर्सिकोटसोबतचे तिचं सर्व लैंगिक संबंध अंधारात ठेवलं होतं. आम्ही तुम्हाला सांगतो की, त्याच्या शरीराच्या काही भागात अधिक महिला संप्रेरक होते, ज्यामुळे त्याची छाती थोडी वर आली आहे. त्याला प्रशिक्षणही देण्यात आलं होतं. याची माहिती मिळताच बोर्सिकोट यांनी आपल्या कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. शीने आपली ओळख सुमारे 18 ते 20 वर्षे जगापासून लपवून ठेवली होती.
दरम्यान, या प्रकरणाने एक राजनैतिक घोटाळा झाला. ज्यामुळे फ्रेंच परराष्ट्र मंत्रालय हादरले कारण जागतिक माध्यमांनी या घटनेची माहिती दिली. मे 1986 पर्यंत, तपासाच्या समाप्तीनंतर, फ्रेंच न्यायालयाने बर्नार्ड बोर्सिकोट यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची आणि शि पेई पु यांना देशद्रोहाचा आणि परदेशी राज्याला माहिती लीक केल्याचा आरोप करत सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस मिटरँड यांनी 1987 मध्ये शि पेई पु यांना माफ केलं. 2009 मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत तो पॅरिसमध्ये कडक देखरेखीखाली राहिली. असे म्हणतात की त्या काळात चीन आणि फ्रान्सचे संबंध चांगले होते, त्यामुळे शिक्षा कमी करण्यात आली होती. 1993 मध्ये त्याचा आयुष्यावर एम बटरफ्लाय नावाचा चित्रपटही तयार करण्यात आला.
SOURCE : ZEE NEWS