Source :- ZEE NEWS
America Trident Missile : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात या हल्ल्याविषयी तीव्र भावना आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर राजकीय आणि कायदेशीर सर्जिकल स्ट्राईक सुरु केला आहे. भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने मिसाइल चाचणीची घोषणा केली आहे. अशात चर्चा सुरु झाली आहे जगातील सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्रांची. जाणून घेऊया पृथ्वीवरील सगळ्यात महागडं आणि पावरफुल हत्यार कोणत्या देशाकडे आहे. याची किंमत किती आहे.
अमेरिका, रशिया, चीन आणि भारतासह जगभरातील शक्तिशाली देश एकमेकांपेक्षा जास्त शक्तीशाली शस्त्रांची निर्मीती करत आहेत. या शस्त्रांची किंमतही खूप जास्त आहे. जगातील सर्वात महाग शस्त्र कोणते आहे आणि त्याची किंमत काय आहे हे समजल्यावर तुम्ही शॉक व्हाल.
जगातील सर्वात महागड्या क्षेपणास्त्राचे नाव ट्रायडंट आहे. ट्रायडेंट क्षेपणास्त्र अमेरिकेकडे आहे. शस्त्रास्त्र निर्माता लॉकहीड मार्टिनने हे क्षेपणास्त्र बनवले आहे. एका ट्रायडेंट क्षेपणास्त्राची अंदाजे किंमतभारतीय चलनात ही रक्कम 5,45,81,37,300 रुपये इतकी आहे. ट्रायडेंट क्षेपणास्त्र हे पाणबुडीवरून प्रक्षेपित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ट्रायडेंट क्षेपणास्त्र थर्मोन्यूक्लियर वॉरहेडसह सुसज्ज आहे. आण्विक-शक्तीवर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्यांमधून प्रक्षेपित केले जाते.
सध्या जगातील फक्त दोनच देशांकडे ट्रायडंट क्षेपणास्त्र आहे. अमेरिका आणि ब्रिटन हे दोनच देश या क्षेपणास्त्राचा वापर करतात. अमेरिकेने हे क्षेपणास्त्र अद्याप कोणत्याही देशाला विकलेले नाही. ट्रायडेंट क्षेपणास्त्रे 12 यूएस ओहायो-क्लास पाणबुड्या तसेच चार रॉयल नेव्ही व्हॅनगार्ड-क्लास पाणबुड्यांवर तैनात करण्यात आले आहे. 80 टन वजनाचे ट्रायडेंट क्षेपणास्त्र 44 फूट लांब आहे. ट्रायडेंट D5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता 12,000 किलोमीटर इतकी आहे. ट्रायडेंट II D5 क्षेपणास्त्र प्रथम 1990 मध्ये तैनात करण्यात आले.
SOURCE : ZEE NEWS