Source :- ZEE NEWS

Prada x Kolhapuri chappal: महाराष्ट्राची कोल्हापूरी संपूर्ण जगात प्रसिद्ध असली तरीही याच कोल्हापुरीला अनुसरून ‘प्राडा’ या इटालियन ब्रँडनं एक चप्पलवजा प्रोडक्ट लाँच केलं. मात्र त्याला कुठंही कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं नाव किंवा श्रेय दिलं नाही. यानंतर प्रचंड वाद, कलाकार आणि नेतेमंडळींच्या पोस्टनं सोशल मीडियावर #Kolhapuri ट्रेंड झाला आणि तिथं या आंतरराष्ट्रीय ब्रँडलाही आपली चूक मानत माघार घ्यावी लागली. आता हीच कंपनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही कुशल कारागिरांच्या साथीनं कोल्हापूरी पायताणापासून प्रेरणा घेत अप्रतिम Product सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

विशेष करार अन् कोल्हापुरीचं नेमकं प्रकरण काय?

प्राडानं कोल्हापुरीवर आधारित सँडलवजा चप्पल तयार करण्यासाठी लिडकॉम आणि लिडकार अशा दोन सरकारी संस्थांशी हातमिळवणी करत MOU वर हस्ताक्षर केले आहेत. बुधवार, 12 डिसेंबर 2025 ला इटलीस्थित महावाणिज्य दूतावास इथं ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. लिडकार आणि लिडकॉमसोबत झालेल्या या करारामध्ये या संपूर्ण उपक्रमाचा आराखडा, प्रक्रिया आणि मार्गदर्शन याची सुस्पष्ट माहिती आहे. प्राडा आणि या भारतीय संस्थांच्या करारानंतर विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या प्रोडक्टची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर 930 युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण 84 हजारांना एक जोड पायताण, इतकी होत आहे. थोडक्यात एक चप्पल 42000 रुपयांना. PRADA चे एक्झिक्युटिव्ह लोरेन्झो बर्टेली यांनी याबाबतची माहिती दिली. 

काही महिन्यांपूर्वी प्राडाचं एक पथक कोल्हापूरी चपलांचं निरीक्षण आणि त्या तयार करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी कोल्हापूर इथं पोहोचलं होतं. जिथं त्यांनी अनेक बारकावे जाणून घेण्यासाठी कारागिरस सहकारी समिती प्रमुख आणि इतरही व्यक्तींची भेट घेतली. दरम्यान संयुक्त परिपत्रकातून समोर आलेल्या या माहितीनुसार प्राडासोबतच्या या कारारामुळं भारतीय हस्तशिल्पकलेला जागतिक स्तरावर वेगळी ओळख. उपलब्ध माहितीनुसार ही प्राडा कोल्हापूरी Limited Ediction अंतर्गत बनवली जाईल. ज्यामध्ये परंपरागत कलेला प्राडाचं आधुनिक डिधाईन आणि उत्तम दर्जाच्या सामग्रीटी जोड मिळून त्यात भारतीय, मराठमोळी संस्कृती आणि आधुनिकतेची झलकसुद्धा पाहायला मिळेल. 

कशी असेल पुढील प्रक्रिया? 

प्राथमिक स्वरुपात कोल्हापुरी चपलांच्या उत्पादनासाठी स्थानिक कारागिरांना प्राधान्य दिलं जाणार असून, या चपलांचे 2 हजार जोड बनवण्यात येतील. दरम्यान प्राडानं या उपक्रमासाठी लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्याशी करार करण्यात आला. 

MAHARASHTRA DGIPR च्या X पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत’. थोडक्यात आता कोल्हापुरी चपलांच्या कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. या स्पेशल एडिशन चपवला फेब्रुवारी 2026 मध्ये प्राडाच्या 40 विक्री केंद्रांमध्ये आणि या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध होतील. 

SOURCE : ZEE NEWS