Source :- ZEE NEWS
Door To Hell: नरकाचा दरवाजा ही संकल्पना तुम्ही कधी ना कधी ऐकली असेलच. अनेक परीकथांमध्ये हा शब्द ऐकलाच असेल. पण तुम्हाला माहितीये का आपल्या पृथ्वीवरदेखील एसाच एक नरकाचा दरवाजा आहे. 50 वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांच्या एका छोट्याश्या चुकीमुळं तयार झालेला का नरकाचा दरवाजा आता बंद होणार आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये गेल्या 50 वर्षांपासून धगधगत असलेली नैसर्गिक विवरातील आग मंदावली आहे. गुरुवारी येथील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आग आता मोठ्या प्रमाणात नियंत्रणाखाली आली आहे.
तुर्कमेनिस्तानच्या काराकुममध्ये एक वाळवंट आहे. येथेच 39 मीटर चौरस आणि 30 मीटर खोल विवर आहे. या विवरात कित्येक दशकापासून आग धगधगतेय. या विवरातून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर आहेत कि कित्येक किमीपासूनच त्या दिसतात. आता तेथील सरकारचा दावा आहे की, ही आग नियंत्रणात आली आहे आणि नरकाचा दरवाजा कायमचा बंद होणार आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, तुर्कमेनिस्तानमधील गेटवे टू हेल क्रेटर 1971 सालापासून धगधगतेय. मात्र आता ही आग विझणार आहे. सोव्हियत वैज्ञानिकांच्या चुकीमुळं 50 वर्षांपासून ही आग धगधगतेय. शास्त्रज्ञ भूमिगत वायूसाठी खोदकाम करत होते. खोदकाम करताना हा खड्डा कोसळला आणि त्यातून विषापी वायू बाहेर पडू लागला. हा वायू बाहेर पडू नयेत म्हणून तिथे असलेल्या शास्त्रज्ञांनी त्याला आग लावली. मात्र ती आग इतकी भडकली की ती आजही धगधगतेय.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, या वायुंचा प्रवाह कमी झाल्यामुळं विवरातील आगीच्या ज्वाळा कमी झाल्या आहेत. तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबातपासून 260 किमी अंतरावर असलेल्या काराकुम वाळवंटाच्या मध्यमागी आहे. या विवरातून खूप दुर्गंधी येते. तरीदेखील दरवर्षी लाखो पर्यटक हे नैसर्गिक आश्चर्य पाहण्यासाठी येतात.
मिथेनला हवामान बदल आणि ओझोन थराच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण मानले जाते. मिथून वायू साठवण्यासाठी आणि त्याचा उर्जा म्हणून वापरण्यासाठी या विवराभोवती अनेक विहिरी खोदण्यात आल्या आहेत. मात्र हा प्रकल्प यशस्वी झालाच नाही.
SOURCE : ZEE NEWS