Source :- ZEE NEWS
आपण ज्या जगात राहतो ते चालवणारा निसर्ग आपल्याला दररोज एक ना एक चमत्कार दाखवत राहतो. संपूर्ण सृष्टीच वेवेगळ्या रहस्यांनी भरलेली आहे. कधी आकाशातून बर्फ पडतो, कधी पाणी, तर कधी वीज, हे सर्व एक प्रकारे निसर्गाचा चमत्कार आहे. निसर्गाचा चमत्कार बघून अनेकदा डोकं भांभावून जाते. तुम्ही तुम्ही कधी ना कधी आकाशातून वीज पडताना पाहिली असेलच. जेव्हा जेव्हा वीज पडते तेव्हा मोठ्या प्रमाणात विनाशही होतो. वीज पडण्याचा अतिशय गंभीर परिणाम होतो. जगातील अशा ठिकाणाचे नाव तुम्हाला माहिती आहे का जिथे वीज सर्वात जास्त पडते?
जगाची वीज राजधानी कोणती?
व्हेनेझुएलातील कॅटाटुम्बो नदीजवळ एक ठिकाण आहे. या ठिकाणाला ‘जगाची वीज राजधानी’ म्हणूनही ओळखले जाते. जिथे वीज सतत चमकत राहते. तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की या ठिकाणी दररोज रात्री सुमारे १० तास आकाशात वीज चमकत राहते. जगात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही एक धक्कादायक गोष्ट आहे.
का निर्माण होते वीज?
कॅटाटुम्बो लाइटनिंग हे व्हेनेझुएलाच्या झुलिया राज्यातील कॅटाटुम्बो नदी आणि माराकैबो सरोवराच्या संगमावर स्थित आहे. याला जगाची लाइटनिंग कॅपिटल म्हणून देखील ओळखले जाते. ही जागा आश्चर्यकारक भौगोलिक घटनांचे केंद्र आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या परिसराच्या सभोवतालच्या टेकड्या, उष्ण वारे आणि तलावातून येणारा ओलावा यामुळे हे वीज वादळ निर्माण होते. विशेष म्हणजे इथे एका वर्षात २८० रात्री असतात ज्यावेळी या संपूर्ण काळात आकाशात वीज चमकत राहते.
रात्री किती वेळा वीज चमकते?
माहितीनुसार, कॅटाटुम्बो लाइटनिंगमध्ये एका रात्रीत सरासरी १६० ते ३०० वेळा वीज पडते. शास्त्रज्ञांच्या मते, दरवर्षी प्रति चौरस किलोमीटर सरासरी २५० वेळा वीज कोसळते. एवढा मोठा आकडा बघून हे जगातील सर्वाधिक वीज कोसळणारे ठिकाण बनले आहे. पण, सतत पडणाऱ्या विजेमुळे इथली दृश्य खूपच मनमोहक असतात आणि ५० किलोमीटर अंतरावरूनही वीज पडताना पाहता येते
SOURCE : ZEE NEWS