Source :- ZEE NEWS
Baba Vanga Prediction: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशात आणि जगात दहशतीचे वातावरण आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी खोऱ्यात सुरू केलेला मृत्यूचा तांडव पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या हल्ल्यानंतर प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. बाबा वेंगाने आधीच पहलगाम हल्ल्याची अप्रत्यक्षपणे भविष्यवाणी केली होती.
2043 मध्ये संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य असेल असे भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे. पाकिस्तानमध्ये फोफावणाऱ्या मुस्लिम दहशतवादी संघटनांनी जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. 2025 वर्षात जागतिक अशांतता पसरेल. 2025 मध्ये युरोपमध्येही मोठा संघर्ष होऊ शकतो. बाबा वेंगाने 2025 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होण्याचे संकेतही दिले होते. यामुळेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा 2025 वर्षासाठी बाबा वेंगाने वर्तवलेल्या भविष्यवाणीचे संकेत असल्याची चर्चा रंगली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 2025 च्या भविष्यवाण्यांचे भाकित पाहता जे भाकित कलंय तसचं काहीसं घडत असल्याचे दिसत आहे.
2025 वर्षाची सुरुवात महाभयानक असेल असं भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे. 2025 वर्षापासून जगाचा अंत सुरू होईल. 2025 मध्ये युरोपमध्ये एक मोठा संघर्ष निर्माण होईल, ज्यामुळे खंडातील लोकसंख्येत मोठी घट होईल. बाबा वेंगाने 2025 मध्ये शक्तिशाली भूकंपांची भविष्यवाणी केली होती. मार्च 2025 मध्ये म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंप झाला.
नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 साली मृत्यू झालाय. मात्र त्याआधीच त्यांनी या भविष्यवाणी करून ठेवल्यात. विशेष म्हणजे ही भाकितं कुठेही लिखित स्वरुपात नाहीत. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सगळं भविष्य ऐकवलंय. त्यांचे काही आडाखे खरे ठरले, तर काही चुकीचे निघालेत.
SOURCE : ZEE NEWS