Source :- ZEE NEWS

Baba Vanga 2025 predictions : 2025 हे वर्ष महाभयानक असेल. प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगा याने हे भाकित केले होते. 2025 वर्ष सुरु होऊन आता 5 महिने संपत आले आहेत. हे वर्ष संपायला आता फक्त 7 महिने उरले आहेत. बाबा वेंगाने भाकित केलेल्या 2025 वर्षातील अनेक महाभयानक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहे. आता चर्चा सुरु आहे ती उरलेल्या पुढच्या सात महिन्यात आणखी काय चित्र विचित्र घडणार याची.

नेत्रहीन असलेल्या बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केलीय. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, राजकुमारी डायनाच्या मृत्यूबद्दलची भविष्यवाणी बाबा वेगाने केली होती. या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या होत्या.  प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते. 2025 वर्षात  युद्ध, आर्थिक संकट आणि नैसर्गिक आपत्ती येतील असे भाकित बाबा वेंगाने केले आहे. 

2025 मध्ये जगभरात युद्ध आणि आर्थिक संकट येईल असे भाकित बाबा वेगाने केले होते. जागतिक बाजारपेठा अस्थिर करणाऱ्या धोरणांमुळे भू-राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. या भाविष्यवाणी प्रमाणेच घडताना दिसत आहे.  जग आर्थिक संकटाचा सामना करत आहे. 

अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉरमुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. पुरवठा साखळीत व्यत्यय येत आहेत. जागतिक अर्थव्यवस्था इतकी एकमेकांशी जोडलेली आहे.  एका मोठ्या अर्थव्यवस्थेच्या कोसळण्यामुळे जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरता पसरण्याची शक्यता आहे.

2025 वर्षात जागतिक अशांतता पसरेल. 2025 मध्ये युरोपमध्येही मोठा संघर्ष होऊ शकतो. बाबा वेंगाने 2025 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होण्याचे संकेतही दिले होते. यामुळेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा  2025 वर्षासाठी बाबा वेंगाने वर्तवलेल्या भविष्यवाणीचे संकेत असल्याची चर्चा रंगली आहे.

2025 मध्ये विनाशकारी भूकंप येणार असल्याचे भाकितही बाबा वेगाने केले होते.  ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. 28 मार्च 2025 रोजी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला.  टेलीपॅथी अर्थात ब्रेन मशीन इंटरफेसच्या माध्यमातून मानव मेंदूच्या माध्यमातून थेट मनाशी संवाद साधेल. यासाठी कोणत्याही डिव्हाईसचा वापर होणार नाही. 2025 मध्ये पृथ्वीवर अपरिचीत प्राणी दिसतील. 2025 मध्ये  एलियन पहिल्यांदाच मानवांशी थेट संपर्क साधतील अशी भाविष्यवाणी बाबा वेगाने केली आहे.  बाबा वेगाच्या या भविष्यवाण्या देखील खऱ्या ठरतात की काय? अशी चर्चा रंगली आहे. 

SOURCE : ZEE NEWS