Source :- ZEE NEWS

Pakistan Gold Mine : भारत आणि पाकिस्तानात सध्या युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारताच्या मित्राने शत्रूला अर्थात पाकिस्तानला साथ दिली आहे. भारताच्या मित्र असलेल्या एका मोठ्या मुस्लीम देशाने पाकिस्तानातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या  निर्णयामुळे पुढची 50 वर्ष पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत राहणार आहे. 

पाकिस्तानत असलेल्या  बलुचिस्तानमध्ये असलेली रेको डिक खाण ही जगातील सर्वात मोठ्या अविकसित खाणींपैकी एक आहे. या खाणीतून 50  वर्षे दरवर्षी 2 लाख टन तांबे आणि 2.5 लाख औंस सोने काढता येईल. पाकिस्तानातील या सोन्याच्या खाणीत सौदी अरेबिया गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. सौदी अरेबिया या देशाचे भारतासह मैत्रीपूर्ण संबध आहेत. मात्र, तरीही सौदी अरेबिया ने पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रेको डिक खाणीत सौदी गुंतवणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली.  सौदीची मनारा मिनरल कंपनी पुढील 6 महिन्यांत हिस्सा खरेदी करू शकते. लवकरच मोठी घोषणा होऊ शकते असं पाकिस्तानी मंत्री मुसादिक मलिक म्हणाले. सौदीचा हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का ठरू शकते.

गेल्या वर्षी सौदी अरेबियाने या खाणीतील 15 टक्के हिस्सा खरेदी करण्याची ऑफर दिली होती. आता मूल्यांकन चौकट तयार झाली आहे, त्यामुळे करार अंतिम होण्याची अपेक्षा आहे. हा करार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम-चेंजर ठरू शकतो.
तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौदी अरेबिया खाण क्षेत्रात गुंतवणूक वाढवत आहे. रेको डिकची अफाट संपत्ती त्याच्या रणनीतीचा एक भाग आहे. गेल्या वर्षी मनारा मिनरल्सनेही या प्रकल्पाला भेट दिली होती.

पाकिस्तानचे कर्ज त्याच्या जीडीपीच्या 42 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. रेको डिकमधील आपला हिस्सा विकून पाकिस्तान मोठा नफा कमवू शकतो. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात ही खाण महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या खाणीत पाकिस्तान सरकारचा 50 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा कॅनडाच्या बॅरिक गोल्ड कॉर्पकडे आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानचा 15 टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी करत आहे. या करारामुळे खाणीच्या विकासाला गती मिळू शकते.

तज्ञांचा अंदाज आहे की या खाणीत 40 ट्रिलियन टन सोने असू शकते, ज्याची किंमत 1 ट्रिलियन डॉलर्स आहे. 1995 मध्ये, फक्त 4 महिन्यांत 200 किलो सोने आणि 1700 टन तांबे काढण्यात आले होते. सौदी अरेबिया व्यतिरिक्त, इतर आखाती देश देखील पाकिस्तानच्या खाण क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी चर्चा करत आहेत. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानला या खाणीचा फायदा घ्यायचा आहे.

या खाणीवरून पाकिस्तान सरकार आणि बॅरिक गोल्ड कॉर्पमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. आता सौदी गुंतवणूक या प्रकल्पाला एक नवीन दिशा देऊ शकते. ब्लूमबर्गच्या मते, या खाणीतून दरवर्षी 2 लाख टन तांबे आणि 2.5 लाख औंस सोने काढता येते. ही खाण पुढील 50 वर्षांसाठी पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करू शकते.

SOURCE : ZEE NEWS