Source :- ZEE NEWS
Australian Iron Ore Mines: भारताच्या मित्राच्या हाती ‘काळ्या सोन्याचा’ अमाप खजिना लागला आहे. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात मोठे लोहखनिज साठे शोधल्याचा दावा केला आहे. हे काळे सोनं म्हणजे लोखंड धातू आहे. ऑस्ट्रेलियात सापडलेल्या या साठ्याची किंमत 48,79,23,70,50,00,000 इतकी आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये हे लोह खनिजाचे साठे सापडले आहेत. इथं अब्जावधी डॉलर्स किमतीचे लोहखनिज असू शकते. हा खजिना केवळ आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही तर भूगर्भीय संशोधनासाठी क्रांतिकारीही ठरू शकतो. येथे 55 अब्ज मेट्रिक टन लोहखनिज असू शकते. याचीची किंमत सुमारे 5.7 ट्रिलियन डॉलर्स आहे. जर भारतीय रुपयांमध्ये मोजले तर ते 48,79,23,70,50,00,000 रुपये येते.
प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस (PNAS) मध्ये हा शोधाबातचा अहवाल प्रकाशित झाला आहे. या शोधामुळे पृथ्वीवरील खनिज संपत्तीचे प्रमाण पुन्हा परिभाषित झाले आहे. पीएनएएसच्या अहवालानुसार, लोहखनिजाचा हा प्रचंड साठा हॅमरस्ली प्रदेशात आहे.
अभ्यासानुसार, लोहखनिजाची निर्मिती प्राचीन खंडांच्या क्रियाकलापांशी गुंतागुंतीची जोडलेली दिसते. ऑक्सिजनेशन घटनेवर केंद्रित मागील सिद्धांतांना देखील आव्हान देते. या सिद्धांतानुसार, लोहखनिजाचे मोठे साठे दीर्घ भूगर्भीय कालावधीत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत तयार झाले असावेत.
हॅमर्सली येथील साठा हा सर्व ज्ञात लोहखनिज साठ्यांपैकी सर्वात मोठा आहे. जगातील आघाडीचा लोहखनिज निर्यातदार म्हणून ऑस्ट्रेलियाचा दबदबा वाढणार आहे. चीन आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये लोहखनिजाची मागणी वाढत असल्याने याचा जागतिक पोलाद उत्पादन, पुरवठा साखळी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करारांवर परिणाम होईल.
ऑस्ट्रेलियातील अनेक महत्त्वाचे लोहखनिज साठे बँडेड आयर्न फॉर्मेशन्स (BIFs) मध्ये आढळतात, जे प्रीकॅम्ब्रियन युगातील आहेत. BIF सर्व खंडांवर आढळतात. पश्चिम ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे लोहखनिज उत्पादक राज्य आहे, जिथे 2021-22 मध्ये सरासरी 53 टक्के लोहाचे प्रमाण असलेले अंदाजे 45.2 बिलियन टन लोहखनिज संसाधने आणि साठे आहेत. 1160 च्या दशकात लोहखनिजाची निर्यात सुरू झाली. हे आता ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख निर्यात उद्योगांपैकी एक आहे. 2020 मध्ये लोहखनिजाचे वार्षिक निर्यात मूल्य 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचले, असे करणारी ही पहिली वस्तू होती.
SOURCE : ZEE NEWS