Source :- ZEE NEWS

India Pakistan War: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळं बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवरील हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाइलने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र भारताने पाकिस्तानचा हा हल्ला उधळून लावला. भारताच्या डिफेन्स सिस्टमने ड्रोन आणि मिसाईल हवेतच नष्ट केले. भारताने दिलेल्या या करारा जवाबानंतर पाकिस्तान पुरता हादरला आहे. शुक्रवारी भारताने पाकिस्तानी एयरबेसवर हल्ला करत उद्ध्व्स्त केले आहे. पाकिस्तानने फिरोजपूर, सिरसासह अनेक जागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तो हल्ला परतवून लावण्यात यश आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान आर्मी चीफ आसिम मुनीर भारतात आणखी हल्ले करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिम मुनीर हे आयएसआयचे चीफ असतानाच 2019मध्ये पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. काही वृत्तसंस्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पीओकेमध्ये भारताने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या अत्यंयात्रेत पाकिस्तानी सैन्यातील काही अधिकारीदेखील होते. पाकिस्तानी सेना आणि दहशतवाद्याचे संबंध हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच भारताकडून हा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरला आहे. 

दहशतवादी तळ भारताने उद्ध्व्स्त केल्यानंतर पाकिस्तान बदला घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानी सेना या संधीचा फायदा घेऊ शकते आणि दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यास त्यांना मदत करु शकतात. एलओसीवर सातत्याने फायरिंग होत आहे त्याचादेखील हाच मुळ उद्देश आहे. भारत आणि पाकिस्तानकडून सीमेवर होणाऱ्या छोट्या मिसाइलमधील वॉर आता मोठ्या हल्ल्यात रुपांत होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची डिफेन्स सिस्टिम भारताच्या तुलनेत कमजोर आहे. त्यामुळं पाकिस्तानला मोठं नुकसानदेखील सहन करावा लागतोय. त्यामुळं आपला पराभव समोर दिसत असताना पाकिस्तानी सेना दहशतवाद्यांना पुढे करु शकते. 

भारताच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार, गेल्या 10 वर्षांत भारताने दहशतवादाविरोधात फास आवळला होता. दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता पुन्हा एकदा दहशतवादी भारतावर हल्ला करु शकतात. त्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या आधार घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

SOURCE : ZEE NEWS