Source :- ZEE NEWS

अजून भारतानं पाकिस्तानवर पूर्ण क्षमतेनं हल्लाही केलेला नाही. मात्र आधीच पाकिस्तानचे खिसे रिकामे झाले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर केलं. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल्स भारतानं हवेतच नष्ट केले. त्यानंतर भारतानं जल, स्थल आण आकाश अशा तिन्ही बाजूनं पाकिस्तानवर हल्ला केला. यात पाकिस्तानातील लहोर, कराची, इस्लामाबाद या शहरांचा चेहरामोहरा बदलून गेला. भारतानं पाकिस्तानवर असा हल्ला केला की पाकिस्तान्यांना रात्र जागून काढावी लागली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सरकारवर कर्जासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानी अर्थ मंत्रालयानं सोशल मीडियावर तसं आवाहन केलं आहे. 

– शत्रूच्या हल्ल्यामुळे आमचं मोठं नुकसान 

– पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय भागिदारांकडे कर्जाची मागणी 

– युद्ध आणि शेअर बाजारातील पडझड यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय भागिदारांकडे मदतीची मागणी 

मात्र पाकिस्तानची ही मागणी सर्वांनीच धुडकावून लावलीय आहे. कंगाल देशाला कर्ज कोण देणार अशीच भूमिका सर्वांनी घेतली आहे. आपलं पितळ उघडं पडणार आणि जगभरात नाचक्की होणार हे लक्षात येताच पाकिस्ताननं यावर पडदा टाकण्यासाठी आमचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. मात्र हा दावाही खोटा असल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तान काहीही दावा करो मात्र पाकिस्तानला  भिकेला लावायचंच असा निश्चय भारतानं केला आहे. 

भारत IMFकडून पाकिस्तानला मिळणा-या कर्जाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. भारत FATF मध्ये पाकिस्तानी दहशतवादाचे पुरावे सादर करणार आहे.. इतकंच नाही तर पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी करणार आहे. 

दोन दिवसाच्या युद्धातच पाकिस्तान गुडघ्यावर बसला आहे. पैशांसाठी रडू लागला आहे. मदतीसाठी वणवण फिरू लागला आहे. मात्र भारताचा निर्धार पक्का आहे, जोपर्यंत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट होणार नाहीत तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार आहे.

SOURCE : ZEE NEWS