Source :- ZEE NEWS

Gold Import from Dubai: अनेक जण सोन  खरेदीसाठी दुबईत जातात. दुबईतून सोन खरेदी करणाऱ्या भारचीयांना झटका देणारी बातमी आहे. दुबईतून स्वस्त दरात सोन खरेदी करण आता अवघड होणार आहे. भारत सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर काही नवीन नियम लागू केले आहेत. या अंतर्गत दुबईहून थेट सोने आणता येणार नाही. दुबईहून सोने आयात करायचे असेल तर तुम्हाला फक्त सरकारने निवडलेल्या एजन्सींशी संपर्क साधावा लागेल.

सोन्यावर कोणताही कर लागत नसल्याने दुबईमध्ये सोने स्वस्त मिळते.  तसेच तेथे सोन्याचा व्यापार केंद्र असल्याने आयात शुल्क कमी होते. भारतामध्ये सोन्यावर 3% GST लागतो, तर दुबईमध्ये हा कर शून्य आहे, त्यामुळे दुबईत सोने स्वस्त मिळते. 
भारत सरकारने 2026 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात दुबईतून आयात केल्या जाणाऱ्या सोन्याबाबत नाव नियम लागू केला. 

आता फक्त काही विशिष्ट एजन्सीज सोने आणि चांदी आयात करू शकतील. याशिवाय, काही ज्वेलर्स आणि भारत आणि यूएईमधील करारानुसार परवाने असलेले लोक देखील ते आयात करू शकतील. थोडक्यात काय तर आता कुणीही अगदी सहज दुबईहून थेट सोने आणू शकणार नाही. सरकारने यावर बंदी घातली आहे. 

बजेटमध्ये एचएस कोड बदलण्याबाबत चर्चा झाली. एचएस कोड हा एक प्रकारचा क्रमांक आहे, जो कोणत्या वस्तूची आयात किंवा निर्यात केली जात आहे हे दर्शवितो. सरकारने सोन्याचा धागा, चांदीचा धागा आणि 99 टक्के पेक्षा जास्त प्लॅटिनम असलेल्या वस्तूंसाठी नवीन कोड तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.

काही लोक या नियमाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेत होते. दुबईहून 99 टक्के सोने आणत असत पण ते प्लॅटिनम म्हणून घोषित करून कमी कर भरत असत. भारत आणि यूएईमधील करारानुसार काही गोष्टींवर कर सवलत दिली जाते आणि हे लोक त्याचा फायदा घेत होते.

हा गोंधळ टाळण्यासाठी सरकारने प्लॅटिनमसाठी एक नवीन एचएस कोड तयार केला आहे. आता फक्त तेच प्लॅटिनम स्वस्तात उपलब्ध असेल ज्यामध्ये 99 टक्के किंवा त्याहून अधिक प्लॅटिनम असेल. इतर प्रकारच्या प्लॅटिनमच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सोन्याला प्लॅटिनम घोषित करून तस्करी करण्याचा मार्ग बंद झाला आहे.

SOURCE : ZEE NEWS