Source :- ZEE NEWS
India Pakistan War : पाकिस्तानकडून भारतातील 4 राज्यांमधील 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. 07-08 मे 2025 च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण भारताने पाकिस्तानचा मनसुबा उधळून लावला. हे एकात्मिक काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमद्वारे निष्क्रिय करण्यात आले. या हल्ल्यांचे अवशेष आता पाकिस्तानी हल्ल्यांना सिद्ध करणाऱ्या अनेक ठिकाणांहून सापडत आहेत. भारताकडून पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला.
आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानप्रमाणेच त्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले आहे. लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्याचे विश्वसनीयरित्या समजले आहे. दुसरीकडून पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये काल रात्री एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा करण्यात आला. सीमा सुरक्षा दलाने (BSF) मध्यरात्री खात्मा केला. पाकिस्तानी घुसखोर अंधाराचा फायदा घेत सीमा ओलांडत होता. BSF जवानांच्या व्यक्ती नजरेत आल्यावर त्यांनी गोळीबार करून त्याचा खात्मा केला.
भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं त्याच प्रमाणात आणि त्याच तीव्रतेनं प्रत्युत्तर दिलंय. त्याआधी पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर अंधादुंध गोळीबारासह तोफांचाही मारा केला होता. त्यात 16 नागरिकांनी जीव गमावला. यात 3 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. त्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं.
आता प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. भारत सरकारने या कारवाईवर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारतानेही पाकिस्तानला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय लष्कराची मोठी कारवाई! पाकिस्तान रडार सिस्टिम उद्ध्वस्त, हल्लाचा प्रयत्न हाणून पाडला
SOURCE : ZEE NEWS