Source :- ZEE NEWS

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रणगाड्यावर उभं राहून भारताला पोकळ धमकी दिली. त्यामुळे आपण त्यांना 1971च्या युद्धाची आठवण करून दिली. आता ज्या रणगाड्यावर मुनीरमियाँ उभे होते, त्या रणगाड्यांची आपण आता तुलना करणार आहोत. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडे लष्करी रणगाड्यांचा मोठा साठा आहे.भारताची रणगाड्यांची रचना प्रामुख्यानं मैदानी आणि पर्वतीय भागातील युद्धासाठी तयार केलेली आहेत. भारताकडे एकूण अंदाजे 4,200 रणगाडे आहेत.

भारताकडील प्रमुख रणगाडे
T-90S भीष्म

रशियन T-90 ची भारतीय आवृत्ती
वजन –  46.5 टन
रेंज –  650 किमी
संख्या –  अंदाजे 2,000 आहे 
वैशिष्ट्ये – 125mm स्मूथबोअर गन, रिअॅक्टिव्ह आर्मर, लेझर-गायडेड मिसाइल्स, आणि रात्री लढण्याची क्षमता

भारताकडील प्रमुख रणगाडे
अर्जुन Mk-1/Mk-1A

DRDO ने विकसित केलेला स्वदेशी रणगाडा
वजन – 58.5 टन
 रेंज 450 किमी.
वैशिष्ट्ये – 120mm रायफल्ड गन, प्रगत फायर कंट्रोल सिस्टम, रिअॅक्टिव्ह आर्मर

भारताकडील प्रमुख रणगाडे
T-72 अजय

रशियन T-72 ची सुधारित आवृत्ती
वजन – 41.5 टन
रेंज – 480 किमी.
अंदाजे 2,400 युनिट्स
वैशिष्ट्ये – 125mm गन, रिअॅक्टिव्ह आर्मर, आणि सुधारित इंजिन

भारताचे हे रणगाडे LAC आणि LoCवर तैनात आहेत. जिथं मैदानी आणि पर्वतीय भूभागासाठी लवचिकता आवश्यक आहे. प्रगत ड्रोन आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानामुळं टार्गेटिंग आणि समन्वय सुधारला आहे. पाकिस्तानकडे अंदाजे 2,600 रणगाडे आहेत.

पाकिस्तानचे रणगाडे
अल-खालिद

चिनी MBT-2000 वर आधारित स्वदेशी रणगाडा
वजन –  46 टन
रेंज – 500 किमी.
अंदाजे 600 युनिट्स
वैशिष्ट्ये – 125mm स्मूथबोअर गन, रिअॅक्टिव्ह आर्मर, ऑटोलोडर 

पाकिस्तानचे रणगाडे
अल-झरार

चिनी Type-59 रणगाड्याची सुधारित आवृत्ती
वजन: 40 टन
अंदाजे 600 युनिट्स
वैशिष्ट्ये: 125mm गन, सुधारित इलेक्ट्रॉनिक्स, रिअॅक्टिव्ह आर्मर

पाकिस्तानचे रणगाडे
T-80UD

युक्रेनकडून खरेदी केलेले रणगाडे
वजन 46 टन
अंदाजे 320 युनिट्स
वैशिष्ट्ये: 125mm गन, रिअॅक्टिव्ह आर्मर, आणि रात्री लढण्याची क्षमता

पाकिस्तानचे रणगाडे प्रामुख्यानं LoC आणि पंजाबच्या मैदानी भागात तैनातीवर केंद्रित आहेत. चिनी तंत्रज्ञानावर अवलंबित्व, परंतु ड्रोन आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानात भारताच्या तुलनेत पाकिस्तानला मर्यादा आहेत.

तुलनात्मक विश्लेषण             भारत       पाकिस्तान
भारताचे संरक्षण बजेट  $80 अब्ज          $10 अब्ज
रणगाड्यांची संख्या          4,200         2,600
प्रमुख रणगाडे     T-90Sभीष्म , अर्जुन, T-72     अल-खालिद, T-80UD, अल-झरार
वजन         41-58 टन    40-46 टन
मुख्य गन           120mm/125mm    125mm/90mm
रेंज       450-650 किमी    500-550 किमी

रणगाड्यांच्या बाबतीतही भारत पाकिस्तानच्या कित्येक पटीनं पुढे आहे. अधिक दूरपर्यंत मारा करणारे अत्याधुनिक रणगाडे भारताच्या लष्कराकडे आहेत. तरीही पोकळ धमक्या देण्याचं काम पाकिस्ताकडून केलं जातंय. युद्धाचा शंखनाद झाल्यास भारताचं सैन्य आणि भारत तयार आहे, हे मात्र निश्चित.

SOURCE : ZEE NEWS