Source :- BBC INDIA NEWS

‘भारत-पाकिस्तान युद्धाच्या गप्पा नको’; फायटर पायलटची आई असं का म्हणते आहे?

1 तासापूर्वी

काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभर विविध भावनांच्या लाटा उसळल्या. त्यासोबत प्रत्युत्तर म्हणून लष्करी कारवाईच्या चर्चा देशभरात होत आहेत.

या दरम्यान कविता गाडगीळ यांनी समाजमाध्यमांवर जाहिररीत्या एक पत्र लिहिलं. त्या पत्रावर दोन्ही बाजूंनी, समर्थनात आणि टीकात्मक, चर्चा होते आहे.

कविता यांनी उघडपणे ‘युद्ध नको’ अशी भूमिका घेतली आहे. कविता गाडगीळ यांचे पती हवाईदलात होते. त्यांचा मुलगा अभिजीत हासुद्धा भारतीय हवाईदलात होता.

सप्टेंबर 2001 मध्ये मिग-21 विमानाच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वैमानिकांच्या सुरक्षेविषयी कविता यांनी दिलेला लढा देशानं पाहिला होता.

युद्धाचे परिणाम लष्करी कुटुंबावर होतातच, पण ते सर्वसामान्यांवरही तेवढेच होतात, असं कविता म्हणतात.

व्हीडिओ – मयुरेश कोण्णूर

शूट-एडिट – शरद बढे

SOURCE : BBC