Source :- BBC INDIA NEWS

मनू भाकरचं ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवल्यानंतर पुढचं लक्ष्य काय?

22 मिनिटांपूर्वी

22 वर्षांची मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. 2024 ऑलिम्पिकमध्ये तिनं एअर पिस्तूल नेमबाजीत 2 कांस्यपदके जिंकली होती.

2020 च्याऑलिम्पिकमध्ये, पिस्तूल खराब झाल्यानं तिचं पदक हुकलं. त्यानंतर 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिचे दीर्घकाळ प्रशिक्षक असलेले जसपाल राणा आणि ती एकत्र आले.

ती 2018 मध्ये नेमबाजी विश्वचषकात सुवर्ण पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय ठरली.

मनूला यंदा बीबीसी इंडियन स्पोर्ट्‌सवूमन ऑफ द इयर पुरस्करासाठी नामांकन मिळालं आहे.

SOURCE : BBC