Source :- ZEE NEWS

Gold Discovery: आफ्रिका खंडातील सर्वात मागालेल्या देशांपैकी एक असलेला देश रातोरात श्रीमंत जाला आहे. हा देश अचानक प्रकाशझोतात आला आहे आणि यावेळी तो अक्षरशः सोन्याची झळाळी या देशाला प्राप्त झाली आहे असं म्हटल्याचं वावगणं ठरणार नाही. या देशाने अलीकडेच 31 दशलक्ष टन कच्च्या सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केली आहे. या कच्च्या सोन्यातून शुद्ध सोने आणि उतर उत्पानदाचा विचार केल्यास ते 320,000 टन इतकं असू शकेल. मात्र सोन्याच्या या साठ्यामुळे हा देश थोडा टेन्शनमध्येही आहे. नेमकं यामागील कारण काय आणि किती सोनं सापडलंय जाणून घेऊयात…

कोणता आहे हा देश?

आता ज्या देशाला हा जॅकपॉट लागला आहे त्याचं नाव आहे, युगांडा! मागील दोन वर्षांपासून या देशाच्या सरकारकडून सर्वेक्षण केलं जातं होतं. देशभरात हवाई निरिक्षक करण्यात आलं, त्यानंतर भौतिकी आणि भूरासायनिक सर्वेक्षण आणि विश्लेषणे करण्यात आली. देशाचे ऊर्जा आणि खनिज विकास मंत्रालयाचे प्रवक्ते सोलोमन मुयिता यांनी ‘रॉयटर्स’ला ही माहिती दिली. आतापर्यंत युगांडा हा देश लहान जंगली खाण कामगारांचे वर्चस्व असलेलं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होता. मात्र आता क्षेत्राचा विकास करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा सरकारचा विचार आहे.

या सोन्याचं वजन आणि किंमत किती?

युगांडामध्ये खनिज स्वरुपामध्ये सापडलेलं सोनं हे 3100,00,00,000 किलो म्हणजेच 3100 कोटी किलो इतकं आहे. आजच्या दरानुसार या सोन्याची किंमत 13 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास ही रक्कम 1,10,71,91,46,45,99,999 रुपये इतकी होते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर या सोन्याची किंमत 110 कोटी 71 लाख 9146 कोटी रुपये इतकी आहे. 

सरकारसमोर अनेक प्रश्न

आता युगांडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याने या देशाची भरभराट होईल अशी अशा येथील लोकांना आहे. मात्र त्यासाठी सरकारकडून योग्य नियोजनाची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे. आता या इतक्या सोन्याचं नियंत्रण आणि नियम युगांडा सरकार कसं करणार? कोणाच्या मदतीने हे एवढं सोनं युगांडा सरकार जमिनीबाहेर काढणार? त्यासाठी काय आणि कसे करार केले जाणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. गरिबीच्या गर्तेतून या देशाला बाहेर काढण्यासाठी हा साठा खरोखरच मोठा हातभार लावेल असा अंदाज आता तरी व्यक्त केला जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा या सोन्याच्या साठ्याच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या उद्योगांमुळे बळकटी मिळेल असंही सांगितलं जात आहे.

भारताप्रमाणेच दीडशे वर्ष ब्रिटीशांच्या राजवटीखाली

ब्रिटिशांनी संरक्षक (प्रोटेक्टोरेट) म्हणून 1814 साली युगांडाचा पूर्ण कारभार नियंत्रणाखाली घेतला. भारताप्रमाणे या देशावरही साधारणपणे दीडशे वर्ष ब्रिटीशांनी राज्य केलं. 1962 मध्ये ब्रिटिशांनी या देशाचा ताबा सोडला. युगांडा हा देश ‘आफ्रिकेचा मोती’ म्हणजेच The Pearl of Africa म्हणून ओळखला जातो. हा देश मध्य-पूर्व आफ्रिकेत स्थित आहे. युगांडाच्या सीमा केनिया, सुदान, टांझानिया, कांगो आणि रवांडा यांसारख्या देशांना लागून आहेत.

SOURCE : ZEE NEWS