Source :- ZEE NEWS
How India Chose Locations For Operation Sindoor: भारताने 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा सूड घेतला आहे. भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये 70 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील या नऊ ठिकाणीच का हल्ला केला यामागील माहिती समोर आली आहे.
कोणती ठिकाणं निवडली?
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानमधील 9 वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. सीमेपासून 100 किमी आतपर्यंतच्या ठिकाणी लक्ष्य भेदण्यात आला आहे. डझनभर दहशतवादी ठिकाणांची ओळख पटवून, त्यांचा मागोवा घेऊन पंतप्रधान मोदींच्या सूचनांनुसार कारवाई करण्यात आली. भारतीय हवाई दलाने (IAF) 7 मे रोजी पहाटे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारताविरुद्ध हल्ले घडवून आणणाऱ्या दहशतवादी तळांचा शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष्यभेदी कारवाई केली गेली — जशी माहिती पंतप्रधानांनी जाहीर केली होती. भारताने या ऑपरेशनच्या माध्यमातून पहलगामसहीत एकूण सात दहशतवादी हल्ल्यांचा सूड घेतला आहे.
हल्ला झालेली मुख्य दहशतवादी ठिकाणं आणि त्यांची निवड का करण्यात आली
1. बहावलपूर – आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी आतमध्ये हे ठिकाण आहे. जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचं हे मुख्यालय आहे.
2. मुरीदके – सीमेलगत असलेलं मुरीदके हे ठिकाण सांबा सेक्टरच्या अगदी समोर आहे. सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण लष्कर-ए-तय्यबा (LeT) चा तळ आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचे दहशतवादी याच ठिकाणहून आल्याचं सांगितलं जातं.
3. गुलपूर – नियंत्रणरेषेपासून (LoC) 35 किमी आत, पूंछ-राजौरी भागात हे ठिकाण आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील हल्ला व जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची मुळे इथे आहेत.
4. सवाई लष्कर-ए-तय्यबा कॅम्प – पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील टंगधार सेक्टरमध्ये हे ठिकाण 30 किलोमीटर आतमध्ये आहे.
खालील हल्ल्यांची मुळे इथे असल्याचं सांगितलं जात आहे:
सोनमर्ग – 20 ऑक्टोबर 2024
गुलमर्ग – 24 ऑक्टोबर 2024
पहलगाम – 22 एप्रिल 2025
5. बिलाल कॅम्प – जैश-ए-मोहम्मद चे लॉन्चपॅड असलेल्या या ठिकाणावरही भारताने हल्ला केला आहे.
6. कोटली लष्कर-ए-तय्यबा कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 15 किमी आत राजौरी सेक्टरसमोर हा भाग आहे. लष्कर-ए-तय्यबाचा आत्मघातकी तळ असलेल्या या ठिकाणाची क्षमता सुमारे 50 दहशतवाद्यांची आहे.
7. बर्नाळा कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 10 किमी आत असलेल्या राजौरी सेक्टरसमोर हा दहशतवादी तळ आहे.
8. सरजल कॅम्प – जैश-ए-मोहम्मदचा लष्करी तळ असलेल्या सरजल कॅम्प भाग आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किलोमीटर आत आहे. सांबा-कठुआ सेक्टरसमोर हा दहशतवादी तळ आहे.
Bahwalpur, Kotli, Muzaffarabad, Chak Amru, Gulpur, Bhimber, Muridke, Sialkot
I HAVE
Graphically represented here for my people to see and understand.Pakistan, UNDERSTAND THIS. Gloves are off, you could be in mainland Pakistan. If you operate ‘Terror Cottage Industry’
WE WILL… pic.twitter.com/ht1dQ7kfHV— Dr MJ Augustine Vinod (@mjavinod) May 6, 2025
9. महमूना कॅम्प – आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किमी आत, सियालकोटजवळ.
हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा प्रशिक्षण कॅम्प.
SOURCE : ZEE NEWS