Source :- ZEE NEWS
Extramarital Affair : पती-पत्नीमधील नाते जितकं जवळचे असतं तितकंच ते विश्वासावर उभ असतं. असं म्हणतात नात्यात बंधने सोप असतं पण ती प्रामाणिकपणे निभवणे फार कठीण असतं. नात्यात प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि सुरक्षेसोबत सन्मान असला की ते नातं जगातील सर्वात सुंदर नातं असतं. पण जेव्हा या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होत तेव्हा या नात्याला तडा जातो. चीनमधील एशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पत्नीने मुलांच्या सुरक्षेसाठी घरात कॅमेरा लावला. पण पतीचे नको कांड कॅमेऱ्यात कैद झाले. पती बेडरुममध्ये गर्लफ्रेडसोबत नको त्या अवस्थेत असताना हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. पत्नीने है दृश्य पाहिल्यानंतर रागाच्या भरात पतीचा रोमान्स तिने सोशल मीडियावर व्हायरल केला.
तीला कल्पनाही नव्हती की त्याच्या स्वतःच्या पत्नीने त्याचा रोमँटिक व्हिडीओ शूट करून इंटरनेटवर पोस्ट केला आहे. जेव्हा त्याच्या प्रेयसीला हे कळले तेव्हा ती संतापली आणि ती गप्प न राहता तिने बॉयफ्रेंडच्या पत्नीला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक या विचित्र पण मनोरंजक कथेचा आनंद घेत आहेत. (wife installed Camera in house for children safety but husband found in bedroom with girlfriend Physical relationship Extramarital affair video viral)
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हे प्रकरण ग्वांग्शी येथील आहे. पतीचा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबतचा व्हिडीओ दाखवण्यासाठी बनवण्यात आला होता. येथे ली आडनाव असलेल्या एका महिलेने तिच्या पतीच्या एका फ्लॅटमध्ये एक गुप्त कॅमेरा बसवला. तिला माहित होते की तिचा नवरा त्याच्या प्रेयसीसोबत इथे राहतो. ऑगस्ट 2023 मध्ये, प्रेयसीला हा छुपा कॅमेरा दिसला आणि त्यांचा रोमँटिक व्हिडRओ अनेक वेळा रेकॉर्ड करण्यात आला होता आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. संतापलेल्या प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली आणि लीला फुटेज डिलीट करण्यास सांगितले. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिने हे प्रकरण न्यायालयात नेले. तिने केवळ फुटेज हटवण्याचीच नाही तर तिच्या गोपनीयतेला, प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला हानी पोहोचवल्याबद्दल सार्वजनिक माफी मागण्याची आणि भरपाईची मागणी केली.
न्यायालयाने कोणता निर्णय दिला?
लीने न्यायालयाला सांगितले की, हे घर तिच्या पतीचे आहे, त्यामुळे ती कायदेशीररित्या तिथे काहीही करू शकते आणि तिने मुलांसाठी कॅमेरा बसवला आहे. तिने नंतर कबूल केले की, तिने तिच्या पतीला फसवणूक करण्यापासून रोखण्यासाठी हे फुटेज ऑनलाइन पोस्ट केले. त्या बदल्यात, न्यायालयाने तिला फुटेज काढून टाकण्यास सांगितले. मात्र नुकसानभरपाई आणि माफीची त्याची मागणी फेटाळून लावली. प्रेयसीने हे प्रकरण उच्च न्यायालयातही नेले पण तिथेही तिला निराशा पदरात पडली. कारण तिचे अनैतिक संबंध होते.
SOURCE : ZEE NEWS