Source :- BBC INDIA NEWS

मेधा पाटकर

फोटो स्रोत, Getty Images

25 एप्रिल 2025, 11:29 IST

अपडेटेड 13 मिनिटांपूर्वी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रमुख मेधा पाटकर यांना गुजरातमधील एका अब्रू नुकसानीच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावण्यात आली होती. आज त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

व्ही. के. सक्सेना यांच्या तक्रारीवरून पाटकरांविरोधात 2001 मध्ये मानहानीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयाने 2024 मध्ये मेधा पाटकरांना पाच महिन्यांच्या तुरुंगवास ठोठावला होता.

सोबतच त्यांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई व्ही. के. सक्सेना यांना देण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते. सक्सेना सध्या दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

हे प्रकरण 2001 चं आहे. त्यावेळी व्ही. के. सक्सेना यांनी मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाविरोधात एक जाहिरात छापली होती. या आंदोलनाद्वारे पाटकर नर्मदेवर बांधल्या जात असलेल्या धरणाचा विरोध करत होत्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

सक्सेना यांच्या जाहिरातीविरोधात पाटकरांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या पत्रकात त्यांनी सक्सेना यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याची तक्रार सक्सेना यांनी पोलिसात केली होती.

त्यानंतर अहमदाबादच्या एका कोर्टात 2001 साली हे प्रकरण आलं, त्यानंतर हे प्रकरण दिल्लीला स्थलांतरित करण्यात आलं. त्याचा निकाल 1 जुलै 2024 रोजी लागला.

या वेळी स्थानिक प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी राघव शर्मा म्हणाले की, त्यांचं वय आणि तब्येत पाहता त्यांना एक ते दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येत नाही.

शिक्षेच्या आदेशानंतर मेधा पाटकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती.

आपणही सक्सेनांविरोधात तक्रार दाखल केली होती, त्या प्रकरणांवर अद्याप निकाल लागलेला नाही, असं पाटकरांनी सांगितलं.

नर्मदा बचाव आंदोलन काय आहे?

नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या विविध धरण प्रकल्पांमुळे हजारोंचं विस्थापन होणार होतं. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या अनेकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होणार होता. यांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठीच्या या गटाच्या मोहीमेचं नेतृत्त्वं मेधा पाटकर आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी केलं.

2011 साली या मोहिमेसाठी बॉलिवुड अभिनेता आमीर खाननेही मेधा पाटकर यांना पाठिंबा दिला होता. निसर्ग जपणं हा या मोहिमेचा एकमेव हेतू होता, असं गुजरातमधले पर्यावरण कार्यकर्ते आणि नर्मदा बचाव आंदोलनात पाटकर यांच्यासोबत असणाऱ्या रोहित प्रजापती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

“या धरणांमुळे समुद्रपातळीत वाढ होईल असा इशारा आपण तेव्हा दिला होता आणि आता तसंच घडलं असून भरूच शहरात जिथे नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते तिथे समुद्र आत आला आहे,” असं प्रजापती सांगतात.

गुजरातेतल्या नर्मदा खोऱ्यामध्ये आदिवासींसाठी राबवलेल्या मोहिमेमुळे मेधा पाटकर गुजरातमध्ये वादग्रस्त ठरल्याचं अनेकांना वाटतं.

पाटकरांनी उचललेली पावलं सत्तेतल्या भाजपला न आवडणारी असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

2002 मध्ये मेधा पाटकर इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. गुजरातमधल्या गोध्रा दंगलींनंतर त्या स्थानिकांना भेटून त्यांच्याशी बोलत होत्या. हल्ल्याच्या या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC