Source :- ZEE NEWS

India Pakista Ceasfire : भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्धबंदी आहे, अशी माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे. ते म्हणाले की, आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता  दोन्ही देशांचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक पुन्हा चर्चा करणार आहेत, असे मिस्री म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार शस्त्रसंधीसाठी भारताने कोणत्याही अटी ठेवल्या नव्हत्या. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला कोणत्याही अटीशिवाय तयार झाला आहे. सिंदू जलकरार स्थगितच राहणार आहे. 

भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. ती पुढेही कायम राहील. दरम्यान भारत – पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “अमेरिकेने मध्यस्थी केल्याने रात्रभर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि आपल्या हुशारीचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

त्यानंतर त्याला पाकिस्तान परराष्ट्रमंत्री इशक डार यांनी दुजोरा दिला आहे.

या घोषणेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत भारताचा भूमिकेबद्दल सांगितलं. आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता  दोन्ही देशांचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक पुन्हा चर्चा करणार आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलण्याची चर्चा दोन्ही देशांमध्ये झाली आहे. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये अचानक घोषित झालेल्या युद्धबंदीमागे एक मोठे राजनैतिक कारण आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अमेरिकन समकक्षांसोबत सतत चर्चेत होते. या चर्चेचा उद्देश सीमेवरील वाढता तणाव संपवणे आणि शांततापूर्ण तोडगा काढणे हा होता. 

22 एप्रिल 2025 ला जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 27 पुरुषांचे प्राण गेले होते. 

SOURCE : ZEE NEWS