Source :- ZEE NEWS

Vietnam Gold Mine Gold Mines Discovered: सध्या जगातील सर्वच देश सोन्याच्या खाणींचा शोध घेत आहेत. असाच एक देश आहे जिथे सोन्याच्या तब्बल 40 खाणी सापडल्या आहेत. या खाणींमध्ये सोन्याचे 500 साठे आहेत. 300 टन वजनाचे हे सोनं आहे. ज्या देशात हे सोनं सापडले आहे तिथे भारताचे 1 हजार रुपये डायरेक्ट 3 लाख बनतात. जाणून घेऊया  कोणत्या देशात ही सोन्याची खाण सापडली आहे. 

व्हिएतनाम या देशात सोन्याची मोठी खाण सापडली आहे. व्हिएतनाम  हा जगातील सर्वात कमकुवत चलन असलेल्या देशांपैकी एक आहे. भारतात एक हजार रुपये म्हणजे इथे 3 लाख रुपये.  मात्र, हाच छोटासा देश सोन्याने समृद्ध आहे.  व्हिएतनाम मधील लोकांना प्राचीन काळापासून सोन्याचे वेड आहे. व्हिएतनाममध्येच  जगातील पहिले सोन्याचे हॉटेल आहे. आता व्हिएतनाममध्ये 40 नवीन सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. यामुळे व्हिएतनाम मालामाल होणार असून आर्थिकदृष्ट्या हा देश मजबूत होणार आहे. 

व्हीएन एक्सप्रेसने व्हिएतनाममध्ये नव्याने सापडलेल्या सोन्याच्या खाणींचा अहवाल जाहीर केला आहे.  नव्याने सापडलेल्या 40 खाणींमध्ये 30  टन सोने असल्याचा अंदाज आहे. व्हिएतनामच्या विविध प्रांतांमध्ये या खाणी सापडल्या आहेत. बाक, कान आणि तुयेन क्वांगमध्ये आठ, लाई चाऊमध्ये पाच आणि थान होआ आणि न्घे अनमध्ये प्रत्येकी चार खाणी सापडल्या आहेत. एका अंदाजानुसार, व्हिएतनामकडे एकूण 500 सोन्याचे साठे आहेत. येथे एकूण 300 टन सोने असल्याचा अंदाज आहे.

जगातील पहिले सोन्याचा मुलामा असलेले हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोई येथे आहे. गोल्डन लेक असे या हॉटेलचे नाव आहे. या 25 मजली हॉटेलमध्ये 400  खोल्या आहेत. या हॉटेलमध्ये  दरवाजे, खिडक्या, नळ, शौचालये  सर्व काही सोन्याचे बनलेले आहे. सिंगापूर बुलियन मार्केटच्या अहवालानुसार 2021 मध्ये, व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील सर्वात मोठा सोन्याचा नाणे आणि सराफा बाजार होता. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, येथे बार आणि नाण्यांची मागणी 31.01 टन इतकी होती.

SOURCE : ZEE NEWS