Source :- ZEE NEWS
Saudi Arab Gold : जगातील अनेक देशांमध्ये सोने, चांदी आणि तेलाच्या खाणी सापडत आहेत. आता एका मुस्लिम देशाला जॅकपॉट लागला आहे. या मुस्लिम देशात सोन्याचा अति प्रचंड खजिना सापडला आहे. हा देश एका झटक्यात झाला गर्भश्रीमंत झाला आहे. जाणून घेऊया कोणत्या देशात सोन्याची मोठी खाण सापडली आहे.
सोन्याची ही मोठी खाण सौदी अरेबियाने सापडली आहे. सौदी अरेबिया हे जग प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सौदी अरेबियातील मक्काच्या अल खुर्मा भागात मन्सुरह मसारा खाणीच्या दक्षिणेस एक मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. संशोधकांच्या मते, खाणीत मोठ्या प्रमाणात सोने आहे, ज्याचा भविष्यात सौदी अरेबियाला मोठा फायदा होणार आहे.
मन्सुरह मसारा खाणीपासून 100 किमी अंतरावर हा सोन्याचा साठा सापडला आहे आहे. मक्केच्या दक्षिणेस असलेल्या उरुकमध्ये खोदकाम केल्यानंतर हा सोन्याचा साठा दिसून आला. अहवालानुसार, एका टनमध्ये 10.4 ग्रॅम सोने सापडण्याची शक्यता आहे. याशिवाय, आणखी दोन ठिकाणी एका टनमध्ये 20.6 ग्रॅम सोने सापडण्याची शक्यता आहे. सापडलेला धातू हा सोनंच आहे याची पडताळणी झाल्यावर मॅडेन संपूर्ण परिसरात खोदकाम करण्याचा विचार करत आहे. यासाठी 25 किलोमीटर खोदण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे.
125 किमी पर्यंत मोठ्या प्रमाणात सोने सापडले आहे. त्याच्या मदतीने, येत्या काळात सौदी अरेबिया सर्व मोठ्या सोने उत्पादक देशांच्या यादीत अव्वल स्थानावर येऊ शकते. मॅडेनच्या अहवालानुसार, मन्सुरह मसारा खाणीने आतापर्यंत 7 दशलक्ष औंस सोने असल्याचे जाहीर केले आहे. दरवर्षी त्यातून 2,50,000 औंस सोने काढले जाते. तांत्रिकदृष्ट्या ही खाण सौदी अरेबियातील सर्वात प्रगत खाण प्रकल्पांपैकी एक मानली जाते.
मन्सुरह मसारा खाणीचा विस्तार करण्यात येत आहे. त्यातच आता नवीन क्षेत्रांमध्ये सोन्याच्या साठ्याची पुष्टी झाल्यामुळे सौदी अरेबिया आता फक्त तेलावर अवलंबून नसून सोन्याच्या साठ्यांचा देखील शोध घेत असल्याचे दिसत आहे. सौदी अरेबियाच्या नवीन सोन्याच्या शोधामुळे देशाच्या वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात सोदी अरेबियात महसूल, रोजगार आणि जागतिक गुंतवणुकीच्या नवीन संधीही खुल्या होणार आहेत.
SOURCE : ZEE NEWS