Source :- ZEE NEWS

Pakistani Army and citizen Worried: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारत कधीही घेऊ शकतो याची भीती पाकिस्तानला आहे. भारतीय सैन्यानं हल्ला करण्याआधीच पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव सुरु झालीय. कुणी अन्नधान्य जमा करतंय. तर कुणी पेट्रोल.. नेमकं काय घडतंय पाकिस्तानात? जाणून घेऊया. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हालचालींनी  पाकिस्तानला घाम फुटलाय. युद्धाच्या भीतीनं एकीकडे पाकिस्तानी सैन्य बॉम्बगोळे जमा करु लागलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिक पोटापाण्यासाठी पिठाचा साठा करण्यासाठी धावपळ करु लागलेत. ही दृश्य आहेत पाकव्याप्त काश्मीरमधील.. पाकिस्तानी नागरिक मिळेत तेवढा अन्नधान्य आणि पिठाचा साठा आतापासूनच करुन ठेवू लागलेत. कारण पाकव्याप्त काश्मीरमधील या लोकांना माहितीय जर उद्या युद्ध सुरु झालं तर सर्वात आधी पाकिस्तानीच पळ काढतील आणि तिथल्या स्थानिकांवर उपासमारीची वेळ येईल. 
 
पाक व्याप्त काश्मीरमध्ये एलओसी परिसरात सध्या रेशनच्या धान्याची कमतरता आहे. म्हणूनच अन्न धान्यासह पिठाचाही साठा पीओकेमधील नागरिक करु लागलेत. यासंदर्भात स्थानिक प्रशासनानंही आदेश दिलेत की पुढील 2 महिन्यांच्या अन्नधान्याचा साठा करुन ठेवावा. त्यामुळं सीमभागातील पाकिस्तानी आपल्या पोटापाण्याची सोय करण्याच्या गडबडीत आहेत. भारत कधी काय कारवाई करेल सांगता येत नाही. याचा धसका पाकिस्तानी सैन्यासह पाकिस्तानी नागरिकांनीही घेतल्याचं दिसतंय. 

स्थानिकांवर उपासमारीची वेळ 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हालचालींनी  पाकिस्तानला घाम फुटलाय. युद्धाच्या भीतीनं एकीकडे पाकिस्तानी सैन्य बॉम्बगोळे जमा करु लागलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिक पोटापाण्यासाठी पिठाचा साठा करण्यासाठी धावपळ करु लागलेत. ही दृश्य आहेत पाकव्याप्त काश्मीरमधील. पाकिस्तानी नागरिक मिळेत तेवढा अन्नधान्य आणि पिठाचा साठा आतापासूनच करुन ठेवू लागलेत. कारण पाकव्याप्त काश्मीरमधील या लोकांना माहितीय जर उद्या युद्ध सुरु झालं तर सर्वात आधी पाकिस्तानीच पळ काढतील आणि तिथल्या स्थानिकांवर उपासमारीची वेळ येईल. 

पाकिस्तान तुर्कीयेची साथ 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची किती घाबरगुंडी उडालीय याचा खरा अंदाज आता यायला सुरूवात झाली. भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने तुर्कीयेची मदत घेतलीय. तुर्कीयेची युद्धनौका पाकच्या कराची बंदरावर दाखल झालेत. तर तुर्कीयेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रही पाठवल्याचा दावा करण्यात येतोय.

SOURCE : ZEE NEWS