Source :- ZEE NEWS

रात्रीचे अडीच वाजले की पाकिस्तानला धडकी भरते. 18 मेपर्यंत शस्त्रसंधी असणार आहे पण त्यानंतर भारतानं पुन्हा हल्ले केले तर या विचारानं पाकिस्तान पूर्ण भेदरलाय. एरव्ही फुशारक्या मारणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ असोत वा लष्कर प्रमुख असिम मुनीर अडीच वाजताच त्यांचे हातपाय भीतीनं कापू लागतात. पण रात्रीचे अडीच वाजतात पाकिस्तानचे बारा का वाजतात.

ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकला ठोकून काढलं. तेव्हापासून पाकची झोप उडालीय. पाकमध्ये घड्याळात रात्रीचे 2.30 वाजले की धोक्याची घंटा वाजते. मशिदीतून ‘जागे व्हा’ असं आवाहन केलं जातं. सायरन वाजतात आणि तिथले लोक बंकरमध्ये जातात, पण रात्री 2.30 ची पाकिस्ताननं धास्ती का बरं घेतलीय.

ऑपरेशन सिंदूरचा पाकला धसका
 
पाककडून भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ले 

भारताकडून प्रतिहल्ले, पाकचे लष्करी तळ उद्ध्वस्त

भारताकडून रात्री हल्ले होत असल्यानं रात्रीचे अडीच वाजताच पाकचा थरकाप

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकचे लष्कर प्रमुख असीम मुनीरच्या पायाखालची वाळूही सरकते

भारतानं नूरखान उद्ध्वस्त केल्याचं मुनीर यांनी रात्री 2.30 वाजता फोनवर कळवलं, असं खुद्द शरीफ म्हणालेत

लाहोर, कराची, सियालकोट, रावळपिंडीसह अनेक शहरांमधल्या दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानांवर भारतानं रात्रीच निशाणा साधला

भारतानं केलेल्या चौफेर हल्ल्यामुळे पोकळ धमक्या देणाऱ्या पाकची पळता भुई थोडी झाली. पाकचे सर्व ड्रोन्स, क्षेपणास्त्र भारतानं पाडली. त्यानं पाकचे नेते आणि सैन्य ढेपाळलं. बोलायला काय, तोंड दाखवायलाही तिथल्या पाकिस्तानी मीडियाला आणि लष्कराला जागा उरली नाहीय. 6 आणि 7 मेला भारताच्या ऑपरेशन सिंदूर पाकचे मनसुबे साफ उद्ध्वस्त केले. शहाण्यास शब्दांचा मार पुरेसा असतो पण मुर्ख पाकला शस्त्रास्त्रांचाच माराच कळतो. आपला निभाव लागणार नाही हे समजताच पाकचे पंतप्रधान शस्त्रसंधीची भाषा बोलू लागले. आज 18 मे शस्त्रसंधीची मुदत आज संपतेय. त्यामुळे आज रात्री 12 नंतर पुन्हा भारत हल्ले करेल, अशी भीती पाकचे नेते आणि लष्कराला आहे. अर्थात भारत स्वत:हून काहीही करणार नाही, पण पाकनं कुरापत काढलीच तर शांतही बसणार नाही.

चुकीला माफी नाही, ही भारताची भूमिका, त्यामुळे आता पाकिस्तानला स्वप्नातही भारतीय सैन्याचा रूद्रावतार दिसू लागलाय. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी पाकिस्तान सध्या मवाळ भूमिका घ्यावी, दहशतवादी कारवाया बंद कराव्यात आणि भारताच्या नादी लागू नये, अन्यथा पाकचा करेक्ट कार्यक्रम होईल, हे निश्चित.

SOURCE : ZEE NEWS