Source :- ZEE NEWS
Soviet spacecraft Kosmos 482: रशिया म्हणजेच तेव्हाच्या सोव्हिएत संघानं आपलं एक अंतराळयान शुक्र ग्रहावर ( Planet Venus ) पाठवलं होतं. हे अंतराळयान शनिवारी पृथ्वीवर कोसळलं. 53 वर्षांपूर्वी हे अंतराळयान लाँच करण्यात आलं होतं. मात्र ही मोहीम अयशस्वी ठरली होती. युरोपियन युनियन स्पेस एजन्सीने अंतराळयान परतत असल्याला दुजोरा दिला होता. 53 वर्षं अवकाशात अडकलेले सोव्हिएत अंतराळयान 10 मे रोजी अखेरीस पृथ्वीवर कोसळलं. रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसच्या म्हणण्यानुसार, ते मध्य अंदमान बेटापासून 560 किलोमीटर पश्चिमेला हिंद महासागरात पडलं आहे. यापूर्वी, युरोपियन स्पेस एजन्सीने एका अपडेटमध्ये म्हटलं होतं की कॉसमॉस 482 जर्मनीच्या रडारवर शेवटचे दिसले होते. काही दिवसांपूर्वी कॉसमॉस 482 पृथ्वीवर कोसळेल अशी माहिती देण्यात आली होती.
हे अंतराळयान शुक्र ग्रहावर जाणं अपेक्षित होतं. पण तांत्रिक अडचणींमुळे मोहीमेत अडथळा आला आणि हे यान पृथ्वीभोवतीच फिरत राहिलं. हे यान निष्क्रिय होऊन कोसळेल असं लक्षात आल्यानंतर हे कधी होणार याचे अंदाज लावले जात होते. सुरुवातीला 9 ते 13 मे दरम्यान असं होईल असा अंदाज होता. पण नंतर नासा आणि युरोपीय स्पेस एजन्सीने 10 मे सर्वात संभाव्य तारीख असल्याचं सांगितलं होतं.
कोस्मोस 482 चा धोका
हे जुने अंतराळयान कुठे कोसळेल हे शेवटपर्यंत एक गूढच राहिले. वैज्ञानिकांनी अंदाज लावला होता की, 494 किलो वजनाचे हे अंतराळयान विषुववृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे 52 अंशांनी खाली पडू शकते. यामध्ये बहुतेक भूभाग आणि समुद्रांचा समावेश आहे.
कॉसमॉस 482 संदर्भात मुख्य समस्या अशी होती की, ते शुक्र ग्रहाच्या दृष्टीकोनातून बनवण्यात आलं होतं. कठोर वातावरणात टिकून राहील अशाप्रकारे ते डिझाइन केलं होतं. म्हणूनच पृथ्वीवरील वातावरणात ते तुटण्याची किंवा विघटन होण्याची अपेक्षा नव्हती. शास्त्रज्ञांनी सांगितले की ते एकाच तुकड्यात पडण्याची शक्यता वर्तवली होती.
कॉसमॉस 482
कॉसमॉस 31 मार्च 1972 रोजी लाँच करण्यात आले होते. त्यात 3.3 फूट रुंद टायटॅनियम कवच होतं, जे थर्मल इन्सुलेशनने झाकलेलं होतं. तर शुक्र ग्रह खूप उष्ण आहे आणि म्हणूनच अंतराळयानाची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की ते कठोर वातावरणाचा सामना करू शकेल.
कॉसमॉस 482 चं काय झालं?
प्रक्षेपणानंतर, त्याने पृथ्वीच्या कक्षेत आपलं स्थान मिळवले. शुक्राकडे जाण्याच्या तयारीत असताना, त्याच्या टायमरमध्ये काही समस्या आली आणि त्याचे चार तुकडे झाले. 48 तासांच्या आत न्यूझीलंडमध्ये त्याचे दोन तुकडे कोसळले. इतर दोन, कदाचित पेलोड आणि एक वेगळे इंजिन, हाय क्लास युनिटमध्ये गेले.
SOURCE : ZEE NEWS