Source :- ZEE NEWS
Baloch Liberation Army Killed ISIS: पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानाविरोधातील भूमिकांमध्ये आणखी भर पडली आणि या देशापुढं असणारी संकटं आणखी वाढली. एकिकडे दहशतवादाचं समर्थन करण्याचा आरोप पाकिस्तानवर लावला जात असतानाच दुसरीकडे याच पाकिस्तानात बलूच लिबरेशन आर्मी (BLA) नं पुन्हा एकदा देशाच्या लष्कराला सुरुंग लावला आहे. नुकतंच बीएलएनं केलेल्या दाव्यानुसार पासनी प्रांतामध्ये त्यांनी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणाऱ्या एका गुप्तहेराचा खात्माक केला आहे.
बीएलएनं दावा करत सांगितल्यानुसार तीन विविध कारवायांमध्ये बलूच आर्मीनं पाकच्या सैन्यातील, पोलीस दलातील आणि इतर कारवायांसाठी सेवेत असणाऱ्या वाहनांवर निशाणा साधत मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच नाकाबंदी केली आहे. बीएलएच्या माहितीनुसार ठार करण्यात आलेल्या अधिकाऱ्याची ओळख पटली असून, पंजाबच्या खुशाब जिल्ह्यात असणाऱ्या चोरंगी जोहराबादनजीक हकीम वाला निवासी मुहम्मद नवाज अशी त्याची ओळख.
हेसुद्धा वाचा : India-Pak War: दोन मिनिटांच्या आत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत
बीएलएनंच यासंदर्भातील माहिती जारी करत नवाज पाकिस्तानी लष्कर आणि इतर एजंटसह प्रवास करत असतानाच त्याचा खात्मा करण्यात आल्याचं सांगितलं. या हल्ल्यात सलमान नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका एजंटचाही खात्मा करण्यात आला होता. तर, एजंट शाह नजर बीएलएच्या या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आणि पाक लष्कराचं वाहन उध्वस्त झालं.
ग्वादरमध्ये आयएसआयचा वावर….
मुहम्मद नवाज ग्वादर इथं पाकिस्तानच्या या गुप्तचर यंत्रणेचा वावर असून, तिथं ते अनेक कारवायांसाठीचे कट रचत होते. इथं जीराबद्वारा त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आला. जेव्हा नवाजच्या वाहनाचा ताफा पसनीपाशी आला तेव्हात बीएलएनं रिमोट कंट्रोलच्या मदतीनं इथं भयंकर आयईडी स्फोट घडवून आणला. इथं सिक्रेट एजंटचा खात्मा करत असतानाच तिथं पाकिस्तानच्या लष्करावर बीएलएनं जामकी टँक क्षेत्रातही स्नायपर हल्ला चढवला. बलूच लिबरेशन आर्मीनं या सर्व हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत इथऊन पुढंही पाक सैन्यावर हे असे जीवघेणे हल्ले होतच राहतील असा थेट इशारा दिला.
SOURCE : ZEE NEWS