Source :- ZEE NEWS
इंग्लंडमध्ये एक महिला आणि पतीचं आयुष्य पूर्णपणे बदललं, जेव्हा एका साधारण खोकल्यावर उपचार करण्यासाठी ते एका डॉक्टरकडे पोहोचले. महिलेच्या पतीने सांगितलं की, आम्ही एका साधारण खोकल्यासटी डॉक्टरकडे गेलो होतो. मात्र तिथे डॉक्टरांनी आम्हाला तिच्याकडे जगण्यासाठी आता फक्त 18 महिने राहिलं असल्याचं सांगण्यात आलं.
लिंकनशायर येथे राहणाऱ्या टीम डेव्हिस आणि त्यांची पत्नी जेन यांचं आयुष्य मार्च 2024 नंतर अचानक बदललं. टीम यांनी आपल्या पत्नीला कॅन्सर झाला असून हे एक दुर्मिळ प्रकरण आहे. तिच्यावर उपचार केले जाऊ शकत नाहीत. तिला कॅन्सर नेमका कसा झाला हे माहिती नाही.
दुर्मिळ फुफ्फुसाचा कर्करोग
टीम आणि जेन यांना मागील वर्षापर्यंत मेसोथेलियोमा (Mesothelioma) नावाच्या दुर्मिळ आणि उपचार न होऊ शकणाऱ्या कॅन्सरबद्दल माहिती नव्हती. पण जेव्हा जेन यांना या आजाराबद्दल समजलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना त्यांच्याकडे आता जगण्यासाठी फक्त 18 महिने असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांचं आयुष्य बदललं.
66 वर्षीय जेन अत्यंत तंदुरुस्त आणि निरोगी होत्या. त्या नियमितपणे व्यायाम करायच्या. तसंच कधीही धूम्रपान करत नव्हत्या. त्यामुळे इतका आक्रमक फुफ्फुसाचा कर्करोग कसा झाला हे समजणं त्यांच्यासाठी कठीण होते. जेन आणि टिमला नंतर कळलं की, मेसोथेलियोमा प्रामुख्याने एस्बेस्टोसच्या संपर्कात आल्याने होतो.
एस्बेस्टोस हे एक नैसर्गिक खनिज आहे, जे 1990 च्या दशकापर्यंत इमारत बांधकामात वापरलं जात होतं. त्याचे सूक्ष्म कण फुफ्फुसापर्यंत पोहोचल्यास घातक कर्करोग होऊ शकतात. मात्र, जेनला हा आजार कसा झाला आणि ती एस्बेस्टॉसच्या संपर्कात आली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
जेनला सुरुवातीला कोरडा खोकला आणि थकवा जाणवत होता. तिचा नवरा टिमने तिची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधला, जिथे ECG आणि एक्स-रेनंतर जेनला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं आढळून आलं. यानंतर, बायोप्सीद्वारे जेनला मेसोथेलियोमा असल्याची पुष्टी झाली. कर्करोग प्राथमिक अवस्थेत पकडला गेला असला तरी तो असाध्य होता.
पण यानंतरही जेन यांनी हार मानली नाही. त्यांनी कुटुंबासह वेळ घालवणं सुरु ठेवलं आणि मुलगी हॅरीच्या लग्नातही सहभागी झाली. तसंच आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळावी यासाठी प्रेरणादायीत संदेश देणारे टी-शर्ट घालतात. सध्या जेन Addenbrooke’s रुग्णालयातील क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहेत. या ट्रायलच्या माध्यमातून थोडं आयुष्य वाढवलं जाऊ शकतं.
SOURCE : ZEE NEWS