Source :- ZEE NEWS

Viral News : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विषयांमध्ये आता एका नव्या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, या विचित्र प्रकरणानं सर्वांचच लक्ष वेधलं आहे. बरं, घडलेली ही घटना देशाच्या राजकारणाचं केंद्र असणाऱ्या संसदीय कार्यालयात घडल्यानं अनेकांनाच धक्काही बसत आहे. अमेरिकेत घडलेलं हे प्रकरण आहे एका अनपेक्षित घटनेसंदर्भातलं. 

अमेरिकेतून अतिशय विचित्र प्रकार समोर आला असून, तिथं एस सीनेट कर्मचारी सुनावणी कक्षामध्ये कामक्रीडा करताना पकडला गेला. या घटनेचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आणि त्याची वाऱ्याच्या वेगानं चर्चा झाली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपण या नोकरीलाच वैतागलो असून केलेल्या कृतीचा कोणताही पश्चाताच होत नसल्याची अजब प्रतिक्रिया दिली आणि थेट दुसरा देश गाठला. 

‘न्यूयॉर्क मॅग्जिन’च्या अहवालानुसार झाल्या प्रकरणाचा आपल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याच्याच भूमिकेवर तो ठाम राहिला. आपण तिथं नऊ- नऊ तास एकाच ठिकाणी बसून वैतागलो होतो आणि म्हणून हे कृत्य केलं अशी कबुलीही त्यानं दिली. मॅसे-जेरोप्स्कीनं या कृत्याची कबुली देत त्यानं यासंदर्भातील माहिती सुद्धा दिली. 

सदर कृत्यानंतर या कर्मचाऱ्यानं त्याच्या जोडीदाराला संसदेचा परिसर दाखवला आणि त्यानंतर पुन्हा तो दुपारी कामावर रुजू झाला. एका ग्रुप चॅटवर त्यानंच या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आणि काही दिवसांनंतर डेली कॉलरवर तो व्हिडीओ पोहोचला जिथं त्याची पोलखोल झाली. व्हिडीओ लीक होताच त्याला सीनेटर कार्डिनच्या कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर कारवाई न करता हे कृत्य. अपमानास्पद असलं तरीही ते अवैध नव्हतं असं निरीक्षण नोंदवलं. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : ‘पप्पा त्यांना सोडू नका… ‘ पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळामुळं पोलिसाच्या मुलानं संपवलं आयुष्य, शेवटच्या पुराव्यानं खळबळ

 

सुरुवातीला या प्रकरणाची बरीच चर्चा झाली. इतकंच काय, तर धमक्या आणि शरमेनं त्यांना मानसिक रुग्णांच्या कक्षातही राहावं लागलं, ज्यानंतर या व्यक्तीनं ऑस्ट्रेलिया गाठत तिथंच मुक्काम केला. दरम्यान या कर्मचाऱ्यानं केलेल्या कृत्यामागं त्यानंच सांगितलेलं आणखी एक कारणही चर्चेचा विषय ठरत असून, आपण अत्यंत दु:खी असून, तिथून पाहेर पडण्यासाठीचीच वाट शोधत होतो असं त्यानं सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर सीनेटमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या अनेकांना आपण ओळखतो, असा दावासुद्धा या कर्मचाऱ्यानं केला. 

SOURCE : ZEE NEWS