Source :- BBC INDIA NEWS
सोपी गोष्ट : NEET UG परीक्षा लेखीच का होणार?
13 मिनिटांपूर्वी
2025 ची NEET – अंडर ग्रॅज्युएट परीक्षा ही पेन अँड पेपर म्हणजे कागद – पेन वापरून सोडवायच्या पद्धतीने होणार आहे. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा निर्णय जाहीर केलाय.
BDS, आयुर्वेद, योग आणि नॅचरोपथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी – AYUSH च्या कोर्सेससाठी ही परीक्षा द्यावी लागते.
Armed Forces Medical Services (AFMS) च्या मिलिटरी नर्सिग सर्व्हिस – B.Sc नर्सिंग कोर्सेससाठीही ही परीक्षा द्यावी लागेल.
OMR म्हणजे ऑप्टिकल मार्क रेकग्शिन पद्धतीने ही परीक्षा होईल. म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तराचा पर्याय असणारा गोळा रंगवत आपलं उत्तर नोंदवावं लागेल.
एका दिवशी – एकाच शिफ्टमध्ये, 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
रिपोर्ट – टीम बीबीसी
निवेदन – अमृता दुर्वे
एडिटिंग – शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC