Source :- ZEE NEWS

Smartphones Baba Vanga Prediction: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात संपूर्ण जग हल्ली स्मार्टफोनमुळे पाच इंचाच्या स्क्रीनमधून तळहातावर आलं आहे असं म्हणतात. मात्र स्मार्टफोनमुळे आरोग्यावर होणाऱ्या व्यापक परिणामांबद्दल धक्कादाय माहिती वेगवेगळ्या संशोधनांमधून समोर येत आहे. अशाच परिस्थितीत आता प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगाने काही दशकांपूर्वी केलेल्या भविष्यवाणीची सध्या जगभरात चर्चा होऊ लागली आहे. बाबा वेंगाने पूर्वीच स्मार्टफोनच्या धोक्याचा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. स्मार्टफोनच्या व्यसनाबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सर्व वयोगटातील लोकांना हानी पोहोचवणाऱ्या एका लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणाबद्दल बाबा वेंगाने भविष्यवाणी केल्याचं उघड झालं आहे. बाबा वेंगाने केलेली भविष्यवाणी खरी ठरणार अशी चिन्हं सध्या दिसत आहेत.

मानवी कल्याण ते धोका…

जागतिक घटनांच्या अचूक भाकितांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगाने असं भाकित व्यक्त केलं होतं की, मानव लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अवलंबून राहतील. मानवी जीवन सुलभ करण्यासाठी तयार केलेल्या तंत्रज्ञानाचे वर्णन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत सुरुवातीला आढळून येते. मानवी कल्याणासाठी तयार केलेलं हे उपकरण भविष्यात मानवासाठीच धोका बनणार असं बाबा वेंगाने म्हटलं आहे. सध्याच्या स्मार्टफोन तंत्रज्ञानाशी हे वर्णन स्मार्टफोनशी मिळते जुळते असल्याची चर्चा आहे. 

मागील 20 वर्षांमध्ये जे सांगितलंय ते घडलंय…

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचं दस्तऐवजीकरण करणाऱ्यांच्या मते, बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की ही उपकरणे मूलभूतपणे मानवाचं वागणं आणि मानसिक आरोग्य बदलण्यास कारणीभूत ठरतील. या बदलांमुळे तंत्रज्ञानाच्या गुलामगिरीचे एक रूप निर्माण होईल ज्याचे समाजावर दूरोगामी परिणाम होतील. आता या भविष्यवाणीकडे मागील 20 वर्षांमधील घडामोडींची सांग घातल्यास असं दिसून येतं की, गेल्या दोन दशकांमध्ये स्मार्टफोन दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्ट झाला आहे. एकेकाळी गरज असलेला स्मार्टफोन हल्ली अनेकांसाठी अगदी व्यसन असल्याप्रमाणे अत्यावश्यक झाला आहे.

अनेक धोके निर्माण झालेत

स्मार्टफोन आता संवाद साधण्याबरोबरच, मनोरंजन आणि आधुनिक अस्तित्वाच्या असंख्य इतर पैलूंच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसत आहे. अर्थात स्मार्टफोन्समुळे मानवाला अभूतपूर्व कनेक्टिव्हिटी मिळाली आहे यात शंका नाही. या कनेक्टिव्हिटीमुळे जग अक्षरशः लोकांच्या तळहातावर आलं आहे. मात्र याच स्मार्टफोनमुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची चिंता वाढत आहे. जे स्मार्टफोनचा जास्त वापरतात त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यसंदर्भातील धोके निर्माण होत असून स्मार्टफोन आणि या सामस्यांचा संबंध सहज लक्षात येण्यासारखा आहे.

वेळीच सावरणं गरजेचं

लहान मुलं, वयस्कर व्यक्तींवर स्मार्टफोनचा अधिक विपरीत परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळेच बाबा वेंगा यांनी दिलेला यंत्रासंदर्भातील इशारा हा स्मार्टफोनबद्दलचाच असल्याचं आता सांगितलं जात असून अजूनही वेळ गेली नसून मानवाने वेळीच सावरणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. 

SOURCE : ZEE NEWS