Source :- ZEE NEWS
Who is Vaibhav Taneja: टेस्लामध्ये सध्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) असलेले वैभव तनेजा यांना 2024 मध्ये मोठं पॅकेज मिळालं, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आपल्या इतर हाय-प्रोफाइल स्पर्धकांच्या तुलनेत त्यांना मिळालेलं हे पॅकेज जास्त होतं. वैभव तनेजा यांची वर्षभरातील एकूण कमाई 139 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 1195.4 कोटी रुपये) इतकी होती, जी गुगलचे सीईओ पिचाई यांच्या पगारापेक्षा 13 पट जास्त होती आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेला यांच्या पगारापेक्षा दुप्पट होती.
रिपोर्टनुसार, तनेजा यांच्या 2024 च्या भरपाईमध्ये सुमारे 3.44 कोटी रुपये मूळ वेतनाचा समावेश होता, ज्यामध्ये बहुतेक स्टॉक ऑप्शन्स आणि इक्विटी अवॉर्ड्सचा समावेश होता. टेस्लाने 13 वर्षांतील सर्वात कमी विक्रीची नोंद केली असतानाही देण्यात आलेलं पॅकेज मोठं आहे. त्या तुलनेत, सत्या नाडेला यांना 2024 मध्ये 79.1 दशलक्ष (सुमारे 680 कोटी रुपये) एकूण वेतन पॅकेज मिळाले, तर सुंदर पिचाई यांचा पगार सुमारे ९२ कोटी रुपये होता.
वैभव तनेजा कोण आहेत?
वैभव तनेजा हे टेक्सासमधील ऑस्टिन येथे स्थित टेस्ला येथे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत. वैभव तनेजा यांच्याकडे तब्बल 17 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह तंत्रज्ञान, किरकोळ विक्री आणि दूरसंचार क्षेत्रात काम केलं आहे. वैभव तनेजा यांना यूएस GAAP ची चांगली जाण आहे आणि फायनान्शिल स्टेटमेंट ऑडिट आणि SEC फाइलिंगचा मोठा अनुभव आहे.
त्यांनी सी-सूट एक्झिक्युटिव्ह्ज, ऑडिट कमिटीज आणि मोठ्या-लहान-कॅप कंपन्यांच्या बोर्ड सदस्यांसोबत काम केलं आहे.
वैभव यांनी यापूर्वी टेस्लामध्ये मुख्य लेखा अधिकारी (Chief Accounting Officer) आणि कॉर्पोरेट नियंत्रक (Corporate Controller) यासारख्या विविध पदांवर काम केलं आहे. त्यांनी SolarCity आणि PricewaterhouseCoopers (PwC) या कंपन्यात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. येथे त्यांना अकाऊंटिंग संदर्भातील जटील समस्या हाताळण्याचा चांगला अनुभव मिलाला.
वैभव हा एक प्रमाणित सार्वजनिक लेखापाल आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आणि दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे.
SOURCE : ZEE NEWS