Source :- ZEE NEWS

Pope Francis Net Worth : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीकत नव्हती.  पोप फ्रान्सिस यांना गंभीर आजार झाला होता. त्यावर उपचारही सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया पोप फ्रांसिस यांच्याकडे किती संपत्ती आहे.  

पोप फ्रान्सिस यांना न्युमोनिया झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला होता. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. व्हॅटिकन कॅमरलेंगो कार्डिनल केविन फॅरेल यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती दिलीये. इस्टर संडेच्या दुस-याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पोप फ्रान्सिस यांचा जन्म अर्जेंटिनातील ब्यूनस आयर्स इथं झाला होता.  पोप पदावर पोहोचणारे ते पहिले जेसुइट आणि पहिले लॅटिन अमेरिकन होते. पोप बेनेडिक्ट सोळाव्यांच्या राजीनाम्यानंतर 2013मध्ये त्यांची निवड करण्यात आली होती. नम्रता, सामाजिक न्याय आणि संपर्क यावर त्यांचा भर होता. 

रिपोर्ट्सनुसार पोप फ्रान्सिस यांनी कधीच पगार घेतला नाही. 2013 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या पोपांपेक्षा वेगळे, चर्चकडून कोणताही पगार स्वीकारण्यास नकार दिला. पोप पदावर असलेल्या व्यक्तीला महिन्याला 27.32 लाख पगार मिळतो. मात्र, पोप फ्रान्सिस पगाराचे सर्व पैसे चर्चला दान करायचे. 

पोप फ्रान्सिस पगार स्विकारात नसला तरे पदाशी संबंधित अनेक मालमत्ता त्यांच्याकडे आहेत. या  मालमत्तेची अंदाजे किंमत 137 कोटींपेक्षा जास्त आहे.  या मालमत्तेत पोप फ्रान्सिस यांच्या पाच कार आहेत. 

पोप फ्रान्सिस यांचा कार्यकाळ

2013 मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावा यांच्या राजीनाम्यानंतर पोप फ्रान्सिस यांची निवड करण्यात आली. अर्जेंटिनामध्ये जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ म्हणून जन्मलेले पोप फ्रान्सिस इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप बनले. त्यांच्या कार्यकाळात, त्यांच्या जेसुइट मूल्यांनुसार साध्या जीवनशैलीच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी त्यांना ओळखले गेले आहे. 2001 मध्ये व्हॅटिकनने पुष्टी केली की पोप होण्यापूर्वीही त्यांनी कधीही चर्चकडून पैसे स्वीकारले नव्हते. दुसरीकडे, कॅथोलिक चर्चकडे एक संस्था म्हणून अफाट संपत्ती आहे. चर्चकडे जगभरात लक्षणीय मालमत्ता आहेत, ज्या चर्चची आर्थिक ताकद मजबूत करण्यासाठी ते काम करतात.

SOURCE : ZEE NEWS