Source :- ZEE NEWS

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पोसएक्सचा मालक एलॉन मस्कबद्दल अजून एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. मॉडल एशले सेंट क्लेयर (Ashley St Clair) हिने काही दिवसांपूर्वी आपलं मुलं हे एलॉन मस्कचं मूल असल्याचा दावा तिने केला होता. हा मुलगा एलॉन मस्कचा वारसदार आहे की नाही याबद्दल न्यू यॉर्क सुप्रीम कोर्टाने पितृत्व चाचणी करण्याचे आदेश दिले होते. या रिपोर्टचा अहवाल समोर आला असून एलॉन मस्क हे मुलाचे वडील म्हणून 99.9999% पुष्टी झाली आहे. तर द वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजे) च्या एका नवीन अहवालानुसार या बाळाचं नाव रोम्युलस आहे. या रिपोर्टनुसार 14 वं मूल एलॉन मस्क यांचं आहे. (world richest Elon Musk father of the 14th child paternity test results revealed Ashley st clair surrogacy)

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने केली होती घोषणा…

26 वर्षीय एशले सेंट क्लेयर (Ashley St Clair) 14 फेब्रुवारी 2025 ला तिनं एक्सच्या माध्यमातून जगभरात एकच खळबळ माजवली होती. तिने यात सांगितलं होतं की, 2024 मध्ये एलॉन मस्क यांनी त्यांच्या 14 व्या बाळाचं स्वागत केलं आहे. त्यावेळी तिने ही बातमी खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर मुलाचं संरक्षणाच्या दृष्टीकोनातून तिने ही बातमी सार्वजनिक केली. 2023 मध्ये सोशल मीडियावर त्यांची भेट झाली. त्यानंतर एलॉन मस्कने तिला सॅन फ्रान्सिस्कोमधील ट्विटर कार्यालयात भेट देण्याचं आमंत्रण दिलं, असं तिने सांगितलं. एशले सेंट क्लेयर यात पुढे म्हणाली की, आमच्या मुलाला सामान्य आणि सुरक्षित वातावरणात वाढू देण्याचा माझा मानस आहे. म्हणून मी विनंती करते की मीडियाने आमच्या मुलाच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आक्रमक रिपोर्टिंगपासून दूर राहावं.

मस्क दरमहा पैसे देण्याची ऑफर

सेंट क्लेअरने असेही सांगितले की तिला मुले जन्माला घालण्याच्या बदल्यात दरमहा 2.5 मिलियन डॉलर म्हणजेच साधारण 25 कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यासोबतच एक अट होती की त्यांनी मुलाच्या जन्म प्रमाणपत्रातून मस्कचे नाव काढून टाकावे. तो मस्कचा मुलगा आहे हे सार्वजनिक करू नका. जरी त्यांनी गोपनीयतेच्या करारावर स्वाक्षरी केली नसली तरी, त्यांनी कायदेशीर कागदपत्रांमधून मस्कचे नाव काढून टाकले. यानंतर, त्याची मासिक मदत $४०,००० वरून $२०,००० करण्यात आली.

एलोन मस्क चाइल्ड प्लॅन समोर…

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, मस्क येणाऱ्या पिढ्यांना बळकटी देण्यासाठी अधिकाधिक मुलांना जन्म देण्याच्या योजनेवर काम करत आहेत, ज्याबद्दल बरेच लोक म्हणत आहेत की त्यांना मुलांची फौज वाढवायची आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मस्क सरोगसीची मदत घेत आहे. तो महिलांसोबत गोपनीय करार करून घेत आहे, ज्यामध्ये मुले जन्माला घालण्याशी संबंधित बाबींचा समावेश आहे. तो महिलांना मुलांना जन्म देण्याच्या बदल्यात पैसे देऊ करत आहे.

अहवालात असेही उघड झालं आहे की मस्कची टीम महिलांशी संपर्क साधते आणि त्यांना सरोगेट मदर बनण्यासाठी प्रोत्साहित करते. क्रिप्टो प्रभावशाली टिफनी फोंग यांनी मस्कने पाठवलेल्या ऑफर सार्वजनिक केल्या, त्यानंतर मस्कने तिला सोशल मीडियावर अनफॉलो केले. शिवोन झिलिस ही मस्क आणि त्याच्या कुटुंबातील चार मुलांची आई आहे. तिला विशेष दर्जा असून ती वारंवार जागतिक नेत्यांच्या बैठकांमध्ये आणि प्रमुख कार्यक्रमांमध्ये मस्कसोबत दिसते. दुसरीकडे, गायिका ग्रिम्स, ज्यांना मस्कपासून तीन मुले आहेत. तिने मुलांच्या ताब्यावरून मस्कशी सार्वजनिकपणे वाद घातला.

SOURCE : ZEE NEWS