Source :- ZEE NEWS

Baba Vanga Prediction On India Pak: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्याला प्रत्युतर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. भारताने पाकिस्तानवर अनेक बंधनंही लादली आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तानचं शस्त्रसंधीवर एकमत झाल्याने तणाव काहीसा निवळला आहे. पण भारत-पाकिस्तानमधील हा तणाव जगाची चिंता वाढवणारा असून, संयुक्त राष्ट्रानेही मध्यस्थी केली आहे. पण दोन्ही देशातील तणाव पाहता भविष्यात काहीतरी मोठं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादरम्यान बाबा वेंगाची भविष्यवाणीही चर्चेचा विषय ठरत आहे. असं म्हटलं जात आहे की, बाबा वेंगांनी भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भातही भविष्यवाणी केली होती. यामध्ये नेमकं काय तथ्य आहे जाणून घेऊयात. 

संपूर्ण जगावर पडेल युद्धाचा प्रभाव

भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान बाबा वांगाच्या भविष्यवाण्या अजूनही चर्चेत आहेत. बाबा वांगा यांनी 2025 मध्ये मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली होती. यावर्षी अनेक देश उद्ध्वस्त होऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी कोणत्याही देशाचं नाव घेतलेलं नव्हतं. पण याआधी त्यांनी केलेली अनेक भाकितं ठरली आहेत. यामुळेच बाबा वांगांच्या भविष्यवाणीत भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा उल्लेख असू शकतो असं मानलं जात आहे. 2025 मध्ये युरोपातील अनेक देशांमध्ये एक भयानक युद्ध होऊ शकते आणि  त्याचा परिणाम जगभर जाणवू शकतो असं भाकित त्यांनी वर्तवलं होतं.

भारत-पाकिस्तान युद्धाची भविष्यवाणी केली होती?

बाबा वांगांनी 2025 मध्ये एका विनाशकारी युद्धाचा उल्लेख केला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू असून, ही गुंतागुंत वाढत चालली आहे. जर दोन्ही देशांमधील तणाव वाढत राहिला तर चिंतेची बाब आहे. 

बाबा वांगा यांनी भारत आणि पाकिस्तानबद्दल कोणतीही ठोस भविष्यवाणी केली नव्हती. मात्र त्यांनी युद्धाबाबत भिती व्यक्त केली होती. बाबा वांगांच्या भाकितांनुसार, युरोपातील अनेक देशांमध्ये तीव्र लढाई होऊ शकते, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येईल.

बाबा वांगा म्हणाले होते की युरोपमध्ये होणाऱ्या भयानक युद्धाचा जगावर परिणाम होईल आणि यामुळे मानवतेचा नाश होऊ शकतो आणि यामुळे संपूर्ण जगासमोर एक मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. रशिया-युक्रेन युद्ध हे याचे एक उदाहरण म्हणून पाहिले जाऊ शकते. या युद्धामुळे, केवळ युरोपच नाही तर संपूर्ण जग प्रभावित होत आहे.

SOURCE : ZEE NEWS