Source :- ZEE NEWS
आपण गेल्या चार वर्षांपासून डेट करत आहोत ती 27 वर्षांची तरुणी नसून 47 वर्षांची महिला असल्याचं समजल्यानंतर तरुणाला धक्काच बसला. तरुणीने आपण 27 वर्षांची असल्याचं सांगितलं होतं. तरुणाने Reddit वर सगळा घटनाक्रम सांगितला आहे. तरुणीने त्याला आपला जन्म 1998 मध्ये झाल्याची बतावणी केली होती. पण तिचा लॅपटॉप तपासला असता, तिचा जन्म 1977 मध्ये झाला असल्याचं उघड झालं.
“मी गेल्या 4 वर्षांपासून माझ्या प्रेयसीला डेट करत आहे. ती नेहमीच एप्रिल 98 मध्ये जन्म झाल्याचा दावा करते. पण मी नुकताच तिच्या लॅपटॉपमध्ये पासपोर्टचा फोटो पाहिला असता तिचा जन्म 77 मधील असल्याचं उघड झालं आहे,” असं तरुणाने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
तरुणाने आपल्याकडे संशय घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं, कारण ती महिला 50 च्या आसपास जाणारी असली तरी २७ वर्षांची दिसत होती असं सांगितलं आहे. मात्र या प्रवासात अनेकदा याचे संकेत मिळाल्याचं त्याने मान्य केलं आहे.
“आम्ही एकत्र असताना अनेकदा मला संकेत मिळत होते. पण मी अनुभवी नसल्याने याकडे दुर्लक्षित केलं,” असं तो म्हणाला. महिला आपल्या दिसण्यावर फार लक्ष केंद्रीत करायची आणि आणि तिच्या सर्व मैत्रिणी 27 वर्षांपेक्षा मोठ्या होत्या असंही त्याने सांगितलं.
“मी जेव्हा जेव्हा तिला पासपोर्ट/आयडी सारखी कोणतीही कागदपत्रं पाहण्यास मागायचे तेव्हा ती काहीतरी निमित्त करून आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करून मला दाखवण्यास नकार देत असे,” असं तो म्हणाला. सर्च केलं असता, त्याला एक पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट सापडली जी डेटिंगच्या काही महिने आधी करण्यात आली होती.
या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “जर हे खरं असेल तर ब्रेकअप कर. ती तुला सतत खोटं बोलत आहे. कोणास ठाऊक तिने तुझ्यापासून आणखी कोणत्या गोष्टी लपवल्या आहेत,” असं एका युजरने लिहिलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की “ती चार वर्षांची फसवणूक मला तिच्यावर कधीही विश्वास न ठेवण्यासाठी पुरेशी असेल. ती तुम्हाला आणखी कशाबद्दल दिशाभूल करण्यास तयार आहे? ते खूपच पॅथॉलॉजिकल आहे.”
SOURCE : ZEE NEWS