Source :- ZEE NEWS

World Biggest Railway Station : जगभरात रेल्वे कनेक्टेव्हिटीचे सर्वोत्तम माध्यम आहे. जगातील विविध देशांमध्ये रेल्वेच जाळे पहायला मिळते.  भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. भारतीय रेल्वेतर्फे दिवसभरात देशभरात 1300 रेल्वे ट्रेन धावतात. यात मेल, एक्सप्रेस, दुरांतो, राजधानी, शताब्दी, वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, लोकल ट्रेनचा समावेश आहे. रेल्वेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगली ताकद मिळते. रेल्वे हे लोकांच्या प्रवासाचे सर्वात स्वस्त माध्यम आहे. भारत अनेक मोठी रेल्वे स्थानके आहेत. मात्र, जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या रेल्वेस्थानकात 44 प्लॅटफॉर्म असून या रेल्वे स्थानकातून 660  ट्रेन धावतात. जाणून घेऊया हे रेल्वे स्थानक कोणते. 

जगातील सर्वात लांभ प्लॅटफॉर्म आपल्या भारतात असले तरी जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आपल्या भारतात नाही. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे. ग्रँड सेंट्रल टर्मिनल असे जगातील या सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकाचे नाव आहे.  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या रेल्वे स्थानाची नोंद झाली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनमध्ये 44 प्लॅटफॉर्म आणि रेल्वे 67 ट्रॅक आहेत. येथे दोन भूमिगत स्तर आहेत.  41 ट्रॅक वरच्या स्तरावर आहेत आणि 26 ट्रॅक खालच्या स्तरावर आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे या रेल्वे स्थानकाचा गुप्त प्लॅटफॉर्म देखील आहे. या रेल्वे स्थानकात एकाचवेळी 44 ट्रेन थांबतात. 

1903 ते 1913 दरम्यान हे  रेल्वे स्थानक बांधण्यात आले. हे रेल्वे स्थानक उभारण्यासाठी 10 वर्षे लागली. हे रेल्वे स्थानक इतके मोठे आहे की दरवर्षी येथे 19,000 हून अधिक वस्तू गायब होतात. दररोज सरासरी 660  ट्रेन येथून जातात आणि 1,25,000 प्रवासी प्रवास करतात. 

 हे रेल्वे स्टेशन एखाद्या राजवाड्यासारखे दिसते. हे रेल्वे स्टेशन इतके सुंदर आहे की अनेक लोक येथे फक्त ट्रेन पकडण्यासाठीच नाही तर त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी देखील येतात. या रेल्वे स्थानकात अनेक हॉलिवूड चित्रपटांचे शुटींग करण्यात आले आहे.  या रेल्वे स्थानकावर एक गुप्त प्लॅटफॉर्म देखील आहे. हा गुप्त प्लॅटफॉर्म थेट वाल्डोर्फ अस्टोरिया हॉटेलच्या खाली स्टेशनच्या जवळच आहे.  अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी या गुप्त प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. 

SOURCE : ZEE NEWS