Source :- ZEE NEWS

Adult Star Annie Knight: तुम्ही धावण्याच्या मॅरेथॉनमध्ये कधीतरी सहभागी झाला असाल. किंवा त्याबद्दल ऐकले तरी असेल. जिथे खूप सारेजण एकत्र येतात आणि धावतात. मॅरेथॉन स्पर्धा ही धावणे किंवा इतर खेळांसारखी असते. पण जर संबंध निर्माण करण्यासाठी अशी कोणतीही स्पर्धा समोर आली तर? आपल्यासाठी ती नक्कीच आश्चर्यकारक  आणि धक्कादायक गोष्ट असेल. भारताला सुसंस्कृतीचा वारसा लाभला असला तरी जगभरात अनेक ठिकाणी अशा विविध गोष्टी घडत असतात. त्यातून विचित्र गोष्टी पुढे येत असतात. ऑस्ट्रेलियामध्ये असाच एक विचित्र प्रकार घडलाय. ज्यामुळे आघाडीच्या पॉर्नस्टारला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

रुग्णलायात दाखल करण्याची वेळ 

ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध अॅडल्ट मनोरंजन स्टार अ‍ॅनी नाईट अलीकडेच अशाच एका स्पर्धेमुळे रुग्णालयात दाखल झालीय. तिने 6 तासांत 583 पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवले. यानंतर तिला जास्त रक्तस्त्राव आणि वेदना होऊ लागल्या. अखेर अ‍ॅनी नाईटला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिने स्वतः तिच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. माझे शरीर आता हे सहन करू शकत नाही, असे ती म्हणाली. 

एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅनी नाईट गेल्या काही वर्षांपासून एंडोमेट्रिओसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. हा एक गंभीर आजार असून ज्यामध्ये गर्भाशयाच्या अस्तर सारख्या ऊती शरीराच्या इतर भागांमध्ये देखील विकसित होऊ लागतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना तीव्र पोटदुखी, जास्त रक्तस्त्राव आणि कधीकधी वंध्यत्वदेखील येऊ शकते. हार्मोनल गोळ्या सोडल्यानंतर तिला ही समस्या आल्याचे सांगण्यात येतंय.

संभोगापूर्वी मासिक पाळी

‘माझे 583 पुरुषांसोबत शारीरिक संबंध झाले. हे होण्यापुर्वीच मला मासिक पाळी सुरू झाली होती. पण आययूडीमुळे रक्तस्त्राव कमी झाल्याची’, माहिती अ‍ॅनी नाईटने दिली. असे असताना काही दिवसांनी रक्तस्त्राव खूप वाढला आणि तीव्र पेटके येऊ लागल्याचे तिने पुढे सांगितले.इतक्या लांब सत्रामुळे शरीराला अंतर्गत दुखापत झाली असावी, असे सुरुवातीला डॉक्टरांना वाटले. पण माझ्या शरीरात लोह आणि प्रोजेस्टेरॉनची कमतरता होती आणि तणावामुळे माझी प्रकृती आणखी बिकट झाली होती, असे तपासात समोर आल्याचे अॅनी नाईटने सांगितले. 

200 लोकांनाच होतं आमंत्रण 

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅनीने सुरुवातीला या चॅलेंजसाठी फक्त 200 लोकांना आमंत्रित केले होते. पण प्रत्यक्षात इव्हेंट सुरु झाला तेव्हा 583 पुरुष घटनास्थळी पोहोचले. असे असताना मी कोणालाही दूर केले नाही, असे तिने सांगितले. पण नंतर तिला उचलून रुग्णालयात नेण्याची वेळ आयोजकांवर आली.

SOURCE : ZEE NEWS