Source :- ZEE NEWS
Turning Lead Into Gold : सोन हा अत्यंत मौल्यवान धातू आहे. विविध कारणासांठी सोन्याचा वापर केला जातो. जगभरातील अनेक देश सोन्याच्या खाणींचा शोध घेत आहेत. यामुळे पृथ्वी पोखरली जात असून पर्यावरणाला देखील हानी पोहचत आहेत. जमिनीत सोन्याच्या धातूचे साठे सापडतात. मात्र, वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच प्रयोग शाळेत सोन बनवलं आहे, पृथ्वीवरील हा सर्वात मोठा वैज्ञानिक चमत्कार मानला जात आहे.
मध्ययुगीन जगात शिशाचे सोन्यात रूपांतर करण्याचे प्रयोग झपाट्याने केले जात होते. आता या प्रयोगांना यशस्वी रुप प्राप्त झाले आहे. CERN (यूरोपियन ऑर्गनाइजेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च) Large Hadron Collider (LHC) ने 2015 ते 2018 दरम्यान प्रयोग शाळेत सोनं तयार करण्याचा चमत्कार केला आहे. या प्रयोगादरम्यान 86 अब्ज सोन्याचे केंद्रक तयार करण्यात आले.
लीड अर्थात शिसे आणि सोने दोन्ही धताू आवर्त सारणीनुसार समान गुणधर्माचे आहेत. सोन्यामध्ये 79 प्रोटॉन असतात, तर शिशात 82. याचा अर्थ असा की जर शिशाच्या अणूमधून काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काढले तर ते सोन्यात बदलू शकते. मात्र, हे कोणत्याही रसायनाने किंवा फॉम्युल्याने करता येत नाही. यासाठी, अशा यंत्राची आवश्यकता आहे जी जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने कणांना टक्कर देऊ शकेल.
फिजिकल रिव्यू जर्नल्स मध्ये या संदर्भातील लेख प्रकाशीत करण्यात आला आहे. एलएचसीमधील शिशाचे केंद्रक प्रचंड वेगाने फिरतात. प्रकाशाच्या वेगाच्या 99.999993% जेव्हा ते एकमेकांजवळून गेले तेव्हा त्यांचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड एकमेकांवर आदळले आणि एक फोटॉन पल्स तयार झाला. या फोटॉनने शिशाच्या अणूच्या अंतर्गत रचनेला हादरवले, ज्यामुळे त्यातून प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बाहेर आले आणि एक सोन्याचे केंद्रक तयार झाले.
या संपूर्ण प्रक्रियेतून तयार झालेले सोने फक्त 29 पिकोग्राम होते, म्हणजेच एका ग्रॅमचा एक ट्रिलियनवा भाग. एका ग्रॅम सोन्यात सेक्स्टिलियन (10^21) अणू असतात, तर येथे तयार होणारे सोने क्षणार्धात नाहीसे होते. हे सोन्याचे केंद्रक LHC च्या भिंतींवर आदळल्यावर तुटतात. पण खरी उपलब्धी त्याच्या प्रमाणात नाही, तर शास्त्रज्ञांनी इतके सूक्ष्म आणि अल्पायुषी सोने कसे मोजले हे समजून घेणे आहे. CERN च्या ALICE (A Large Ion Collider Experiment) टीमने त्यांच्या ZDC (झिरो डिग्री कॅलरीमीटर) डिटेक्टर वापरून या टक्करांमध्ये उत्सर्जित होणारे प्रोटॉन-न्यूट्रॉन मोजले आणि सोन्याच्या निर्मितीचे डेटामध्ये रूपांतर केले.
SOURCE : ZEE NEWS