Source :- ZEE NEWS

Kazakhstan plane crash video : कझाकस्तानमध्ये झालेल्या विमान दुर्घनटनेनंतर आता संपूर्ण जगभरातून हळहल व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले आणि त्याचं स्वरुप सर्वांना हादरा देऊन गेलं. कझाकस्तानातील या विमान दुर्घटनेमध्ये अझरबैजान एअरलाईन्सच्या विमानात अपघातापूर्वी नेमकं काय चित्र होतं, याबाबतचं भयावह चित्रही नुकतंच समोर आलं आहे. 

कझाकस्तानातील अक्ताऊ इथं हे विमान क्रॅश होण्याआधी प्रवाशांमध्ये नेमकं काय वातावरण होतं याचं चित्रण विमानातील एका प्रवाशानं केलं. एम्ब्रेअर जेट 190 हे विमान अझरबैजानच्या बाकू इथून रशियाच्या ग्रोन्झी इथं निघालं होतं. पण, अंतिम स्थानी पोहोचण्याआधीच अक्ताऊ इथं या विमानाचा अपघात झाला आणि एक मोठं संकट ओढावलं. 

… आणि विमान भरकटलं 

फ्लाईट रडारच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हे विमान सुरुवातीचा काही वेळ वगळता त्याच्या निर्धारित मार्गापासून दीर्घ काळ भरकटलं. कॅस्पिअन सागराचं क्षेत्र ओलांडल्यानंतर जिथं या विमानाची दुर्घटना झाली तिथं बराच वेळ आधी ते घिरच्या घालत राहिल्याचं सध्या सांगितलं जात आहे. 

दरम्यान, रशियम माध्यमांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार तिथं एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून, दुसरा प्रवासी विमानातून बाहेर पडण्यासाठी धडपड करताना दिसला. आणखी एका व्हिडीओमध्ये या अपघातातून बचावलेला एक प्रवासी अल्लाहच्या नावाचा धावा करत या अपघातातून आपला बचाव व्हावा यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहे. 

एकिकडे या प्रवाशाचा आवाज येत असतानाच दुसरीकडे विमानातील इतर प्रवाशांचा आक्रोश, गोंधळ आणि भीतीचं धडकी भरवणार रुप संपूर्ण जगासमोर आलं आहे. दरम्यन व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओसंदर्भातील आणखी अधिकृत माहिती मात्र समोर येऊ शकलेली नाही. सध्याच्या घडीला या अपघातात 42 प्रवाशांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कझाक वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार या विमानातून अझरबैझानचे 37 नागरिक प्रवास करत होते. तर, सहा प्रवासी कझाकस्तान आणि 3 प्रवासी किर्गिस्तानचे होते. यामध्ये रशियाच्या 16 प्रवाशांचाही समावेश होता. प्राथमिक स्तरावर अपघात एक पक्षी विमानाच्या इंजिनचा धडकल्यामुळं झाल्याचं सांगण्यात येत असून, या विमान अपघातामागच्या इतर कारणांचा तपास घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याची माहिती अधिकृत मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. 

SOURCE : ZEE NEWS