Source :- BBC INDIA NEWS
57 मिनिटांपूर्वी
मुंबईची युवा फलंदाज इरा जाधवने देशांतर्गत अंडर19 क्रिकेटमध्ये खणखणीत त्रिशतक झळकावलं आणि विक्रमाची नोंद केली.
14 वर्षीय इरानं बीबीसीआयने आयोजित केलेल्या महिलांच्या अंडर-19 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाकडून सलामीला खेळताना मेघालयच्या संघाविरुद्ध केवळ 157 चेंडूत नाबाद 346 धावा केल्या.
19 वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूनं (पुरुष किंवा महिला) बजावलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
याआधी हा विक्रम महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाच्या नावावर होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
Twitter पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
इराने अलूर क्रिकेट मैदानावर खेळताना मेघालयच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवलं तिने 42 चौकार आणि 16 षटकार लगावले.
इराच्या खेळीच्या बळावर मुंबई संघाने 50 षटकांत 3 बाद 563 धावा केल्या. भारतात आतापर्यंतच्या सर्व स्पर्धा आणि वयोगटात महिला संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
इराचा आतापर्यंतचा असा आहे प्रवास
19 फेब्रुवारी 2010 रोजी जन्मलेली इरा पुढच्याच महिन्यात वयाची 15 वर्षे पूर्ण करेल.
इरा जाधवने 8 वर्षांची असताना पहिल्यांदा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तिची फलंदाजीची शैली राईट हँड बॅट, तर गोलंदाजीची शैली राईट आर्म मीडियम फास्ट आहे.
डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या विमेन्स प्रीमियर लिगच्या 2025 लिलावात इराचा समावेश होता, मात्र तिच्यावर एकही बोली लागली नाही. या लिलावात समावेश झालेल्या इरा (14 वर्षे) आअणि अंशू नागर (13 वर्षे) या सर्वात तरुण खेळाडू होत्या.
मात्र, काही दिवसांनी ICC अंडर-19 ट्वेन्टी20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात इराला राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळालं. 18 जानेवारीपासून मलेशियात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
अंशु नागर 13 वर्षे आणि इरा जाधव 14 वर्षांसह या लिलावातील सर्वात तरुण खेळाडू ठरल्या
इरा जाधवने 8 वर्षांची असताना पहिल्यांदा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, इरा मुंबईच्या शारदाश्रम विद्यामंदीर इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे शारदाश्रमचेच माजी विद्यार्थी आहेत.
इरा मुंबईची क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सची चाहती आहे.
क्रिकेट सामन्यात नेमकं काय घडलं?
बंगळुरूतील अलूर क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या 19 वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडक स्पर्धेत मेघालय आणि मुंबई संघात सामना खेळला गेला. यात मेघालयने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई संघाने 50 षटकात 563 धावा केल्या. यात इरा जाधवच्या नाबाद 346 आणि हर्ले गालाच्या 116 आणि दिक्षा पवारच्या 39 धावांचा समावेश आहे.
563 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या मेघालयच्या संघाचं मुंबई संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः पानिपत केलं. मेघालयचा संपूर्ण संघ 26 षटकांत बाद झाला. त्यांना केवळ 19 धावा करता आल्या. मुंबईच्या गोलंदाज जीया आणि ययाती यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले, तर रितिका आणि अक्षया यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
यासह मुंबई संघाने हा सामना तब्बल 544 धावांनी जिंकला.
SOURCE : BBC