Source :- BBC INDIA NEWS

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ

फोटो स्रोत, ANI

15 डिसेंबर 2024

अपडेटेड 18 जानेवारी 2025

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊन दोन महिने होत आले, तरी अद्याप जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले नव्हते. अखेरीस सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आज (18 जानेवारी) जाहीर झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची जबाबदारी स्वतःकडं ठेवली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं पुण्यासह सध्या चर्चेत असलेल्या बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं मुंबई शहरासह ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यापूर्वी मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर खातेवाटपासाठीही असाच उशीर झाला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनानंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांचं खातेनिहाय मंत्रिमंडळ आणि जिल्हानिहाय पालकमंत्री अशा दोन्ही याद्या तुम्हाला खालीलप्रमाणे वाचता येतील.

पाहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री असतील.

बीडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या काही दिवसात बरीच चर्चा झाली. बीडचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं असून, अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्रिपदही असेल.

धनंजय मुंडे यांच्याकडे एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं नाहीय.

  • गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
  • ठाणे – एकनाथ शिंदे
  • मुंबई शहर – एकनाथ शिंदे
  • पुणे – अजित पवार
  • बीड – अजित पवार
  • नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
  • अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
  • वाशिम – हसन मुश्रीफ
  • सांगली – चंद्रकांत पाटील
  • नाशिक – गिरीश महाजन
  • पालघर – गणेश नाईक
  • जळगाव – गुलाबराव पाटील
  • यवतमाळ – संजय राठोड
  • मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
  • रत्नागिरी – उदय सामंत
  • धुळे – जयकुमार रावल
  • जालना – पंकजा मुंडे
  • नांदेड – अतुल सावे
  • चंद्रपूर – अशोक उईके
  • सातारा – शंभूराज देसाई
  • रायगड – आदिती तटकरे
  • लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
  • नंदुरबार – माणिकराव कोकाटे
  • सोलापूर – जयकुमार गोरे
  • हिंगोली – नरहरी झिरवाळ
  • भंडारा – संजय सावकारे
  • छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
  • धाराशिव – प्रताप सरनाईक
  • बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
  • सिंधुदुर्ग – नितेश राणे
  • अकोला – आकाश फुंडकर
  • गोंदिया – बाबासाहेब पाटील
  • कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
  • गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री)
  • वर्धा – डॉ. पंकज भोयर
  • परभणी – मेघना बोर्डीकर
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ यादी

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर कुणाला कुठलं खातं मिळणार, याची उत्सुकता अनेक दिवस विद्यमान सरकारनं ताणून धरली होती. अखेरीस 22 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरा खातेवाटप जाहीर झालं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडेच ठेवलं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते दिलं. तसंच, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्रिपद देण्यात आलं.

23 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्याच्या आठवड्याभरानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या रुपानं एक अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप जाहीर झालं.

आणि 18 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्रीही जाहीर झाल्यानं आता महाराष्ट्रात पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आहे.

कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं?

देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपकडे मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि एकनाथ शिंदे (शिवसेना) हे उपमुख्यमंत्री आहेत.

  • भाजप – 16 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदं
  • शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 8 कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद
महायुती सरकार

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 39 मंत्री असतील. यातील पक्षनिहाय मंत्रिपदं कुणाला मिळाली आणि कुणाला कोणते खाते मिळाले आहे, हे आपण पाहूया.

देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ आणि त्यांची खाती

महायुती सरकारचे तीन प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. यांच्याकडे कोणती खाती असतील, यावरून सत्तेत कोण वरचढ ठरेल, याचा अंदाज ठरणार होता. गृह आणि अर्थ खात्यावरून रस्सीखेच सुरू होती, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे ठेवलं आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर शिल्लख खाती
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम)
  • उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन, उत्पादन शुल्क

फडणवीसांचं खातेनिहाय मंत्रिमंडळ असं आहे :

इतर खात्यांबाबत सुद्धा काही आश्चर्याचे धक्के पाहायला मिळाले आहेत. विशेषत: पहिल्यांदाच मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची धुरा देण्यात आलीय, तर शिवेंद्रराजे भोसलेंकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा देण्यात आलीय.

कॅबिनेट मंत्री आणि त्यांची खाती :

1) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2) राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

3) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

4) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज

5) गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6) गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

7) गणेश नाईक – वन

8) दादाजी भुसे – शालेय शिक्षण

9) संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

10) धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12) उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13) जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

14) अदिती तटकरे – महिला व बालविकास

15) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

16) माणिकराव कोकाटे – कृषी

17) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

18) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

19) संजय सावकारे – कापड

20) संजय शिरसाट – सामाजिक न्याय

21) प्रताप सरनाईक – वाहतूक

22) भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन

23) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

24) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

25) आकाश फुंडकर – कामगार

26) बाबासाहेब पाटील – सहकार

27) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

28) पंकजा मुंडे – पशु संवर्धन, पर्यावरण, वातावरण बदल

29) अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास, उर्जा नूतनीकरण

30) अशोक उईके – आदिवासी विकास

31) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

32) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

33) दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ

राज्यमंत्री आणि त्यांची खाती :

1) माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

2) आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

3) मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

4) इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

5) योगेश कदम – गृहराज्य शहर

6) पंकजा भोयर – गृहनिर्माण

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

महायुतीला स्पष्ट बहुमत

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला प्रचंड बहुमत (237 जागा) मिळालं. भाजपला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. तसंच, काही अपक्षांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.

गेल्या काही दशकांत भाजपप्रमाणे एखाद्या पक्षाला किंवा महायुतीप्रमाणे एखाद्या युतीला पहिल्यांदाच इतके प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, तरीही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होण्यासाठी आठवडा उलटून गेला होता. यासाठी एकनाथ शिंदे यांची नाराजी कारणीभूत असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी पार पडला.

या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. दोन आठवडे व्हायला आले आणि हिवाळी अधिवेशन जवळ आलं, तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नव्हता. मात्र, अखेरीस 15 डिसेंबरची तारीख जाहीर झाली आणि मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

SOURCE : BBC